Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पोलीस गुंडगिरी तात्काळ थांबवा’; विद्यार्थ्यांवरील कारवाईवर हर्षवर्धन सपकाळ आक्रमक, DGP-CP यांची घेतली भेट

विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई, पत्रकारांना अडवणे आणि कथित दडपशाहीच्या घटनांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी DGP आणि मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली. ड्रग्ज प्रकरणातील व्हायरल व्हिडिओची चौकशी करून संबंधित पोलिसावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Jul 23, 2026 | 06:11 PM
‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Follow Us
Follow Us:

पेपरफुटी प्रकरणी संतप्त तरुणाई रस्त्यावर उतरून न्याय मागत असताना पोलिसांचे वागणे मात्र ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिद वाक्यानुसार नसून त्याच्या उलटे ते वागत आहेत. पोलीस गुंडगिरी करत आहेत, लहान मुलांवरही बेछुटपणे लाठीहल्ला करत आहेत, मुलींवरही लाठीहल्ला करत आहेत. पोलीस हे बळाचा वापर करून लोकशाहीने आंदोलनाचा दिलेला अधिकार चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, हे तात्काळ थांबले पाहिजे. महाराष्ट्रात हे पोलीसराज काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक सदानंद दाते व मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून सुरु असलेल्या दडपशाहीच्या घटना थांबवणिण्याची मागणी केली. तसेच पत्रकारांना वार्तांकन करताना अडवणे धक्काबुक्की करणे, ताब्यात यासारख्या घटना थांबविल्या पाहिजेत अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

“पोलिसांनी सरकारचे हस्तक असल्यासारखे वागू नये”

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलीस अत्याचाराचे अनेक प्रकार उघड झाले आहेत, पोलिसांनी त्यांचे काम कायद्यानुसार करावे, सरकारचे हस्तक असल्यासारखे वागू नये. जे चालले आहे ते ताबडतोब थांबवले पाहिजे.”

Vijay Wadettiwar: ‘विद्यार्थ्यांवर लाठीमार अन् ड्रग्जची धमकी हा लोकशाहीवर हल्ला’; विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

“राज्यात ड्रग्जचे रॅकेट सुरु आहे तो पोलिसांकरवीच चालवले जात आहे काय, असा संशय आजच्या एका व्हिडिओमुळे बळावत आहे. विद्यार्थ्यांवर ड्रग्जचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या या पोलिसाला सेवेतून तात्काळ बरखास्त करून अटक करा व त्याची चौकशी करा अशी मागणीही यावेळी केली. या पोलिसाची चौकशी सुरु असून अहवालानंतर कारवाई करू असे महासंचालक आणि पोलीस आयुक्तांनी सांगितले. तसेच राज्यातील सर्व पोलीस अधिक्षकांना सुचनाही देण्यात येतील असेही आश्वस्त करण्यात आले आहे,” असे सपकाळ यांनी सांगितले.

“आंदोलनाचा पुढचा कार्यक्रम जाहीर करणार”

पेपरफुटी प्रकरणी तरुण अत्यंत आक्रमक झालेला असून देशभर त्यांचा आक्रोश दिसत आहे. राहुल गांधी यांनीही हाच मुद्दा गांभिर्याने घेत सर्वात आधी छात्रों की गुंज हे अभियान सुरु केलेले आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस पक्ष सातत्याने या प्रश्नी सर्व जिल्ह्यात आंदोलन करत आहे. या सर्वांचा उद्देश हा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व परिक्षा पद्धतीत सुधारणा करावी हा आहे. अनेक पक्ष व संघटना आंदोलन करत आहेत. याप्रश्नावर महाविकास आघाडी एक बैठक घेऊन आंदोलनाचा पुढचा कार्यक्रम जाहीर करेल असेही सपकाळ म्हणाले.

’50 ग्रॅम पावडर टाकेन…’ पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओवरून राज ठाकरे आक्रमक, ‘पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का?’ असा सवाल केला उपस्थित

“कुंभकर्ण जागा झाला” अण्णा हजारेंच्या आंदोलनावरून टीका

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कुंभकर्ण जागा झाला हे दोन घटनातून दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व प्रकरणावर एक ट्विट केले आहे, ते विधान खोटारडेच आहे तर दुसरीकडे अण्णा हजारे सुद्धा जागे झाले आहेत आता अण्णांनी पुन्हा झोपी जावू नये, असे सपकाळ म्हणाले.. या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे, ॲड. कल्याणी माणगावे यांचा समावेश होता.

Web Title: Harshvardhan sapkal police action student protest dgp meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Anna Hajare
  • CJP Protest
  • Harshvardhan Sapkal
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?
1

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?

Manoj Jarange PC:  मी एकटाच मुंबईला जाणार, फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकणार: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय
2

Manoj Jarange PC: मी एकटाच मुंबईला जाणार, फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकणार: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
3

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; ‘तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,’ परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील
4

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; ‘तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,’ परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.