Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’, Harshvardhan Sapkal यांचा फडणवीसांवर घणाघात! PM मोदी, अमित शाहांनासुद्धा घेरलं

Harshvardhan Sapkal : भाजपच्या संविधान बचाव मोहिमेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपाच्या तोंडात संविधान आणि मनात मनुस्मृती असल्याचा टोला लगावत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केलं.

  • By विवेक
Updated On: Nov 02, 2026 | 08:14 PM
Harshvardhan Sapkal

Harshvardhan Sapkal

Follow Us
Follow Us:
  • हर्षवर्धन सपकाळांचा भाजप आणि फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
  • वोटचोरीच्या आरोपांवरून मोदी-शाहांना घेरलं
  • १३ कोटी मतदारांच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर टीका
 

मुंबई : भाजपकडून देशभरात लोकशाही आणि संविधान बचाव रॅली आयोजित केल्या जात आहेत. काल (रविवार, 1 नोव्हेंबर) INDIA आघाडीकडूनही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर जोरदार आंदोलन पार पडले. यावरूनच आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

“भाजपच्या तोंडात संविधान आणि मनात मनुस्मृती असल्याची टीका करत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही आरोप केले आहेत.

काय म्हणाले सपकाळ ?

भाजप व मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करत सपकाळ म्हणाले, “दिल्लीतील रामलीला मैदानावरील ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या इंडिया आघाडीच्या अभूतपूर्व महारॅलीने दिल्लीतील मोदी सरकारला प्रचंड हादरे बसले आहेत. या महारॅलीचा धसका घेतल्याने भाजपा देशभर लोकशाही बचाओ, संविधान बचाओ रॅली करत आहे, परंतु संविधान व लोकशाहीचे खरे मारेकरी भाजपा व RSS हेच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संविधान व लोकशाही वरून काँग्रसवर आरोप करणे हे हास्यास्पद आहे.”

Sanjay Raut : अमित शाहांना गृहमंत्रिपदावरून हटवा! संजय राऊतांची मोदींकडे मोठी मागणी; 13 कोटी घुसखोरांच्या मुद्द्यावरून थेट सवाल

“भाजपाची मातृसंस्था RSS ला बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच मान्य नाही, भाजपावाले तर उघडपणे संविधान बदलाची भाषा करत आहेत. भाजपाच्या तोंडात संविधान आणि मनात मनुस्मृती आहे. त्यामुळे भाजपाची ‘लोकशाही व संविधान बचाओ’ची आगपाखड म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत,” असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

घुसखोरांची आकडेवारी जाहीर करण्याचं फडणवीसांना आव्हान

भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “१३ वर्ष सत्तेत राहुनही भाजपा आजही जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राहुल गांधी यांच्यावरच आरोप करत आहे. त्यांनी काय दिवे लावले हे सांगत नाही. २०२४ च्या निवडणुकीत वोटचोरी करून मोदी व फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले आहे, त्यांची वोटचोरी पकडली असून त्यांची सत्ता तर जाणारच आहे पण सत्ता गेल्यानंतर कारवाई होणार या भितीने त्यांची झोप उडाली आहे.”

“मोदी-शाह सरकार ज्ञानेशकुमारांच्या मदतीने १३ कोटी नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवत आहे. हा संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार भाजपा सरकार हिरावून घेत आहे. घुसखोरांची भाषा करतात पण किती घुसखोर पकडले हे मात्र सांगत नाहीत. फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर घुसखोरांची आकडेवारी जाहीर करावी, घुसखोरांच्या नावाखाली नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ नका. लोकशाहीत रेजिम चेंज म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन आणि राजकीय पक्ष त्यासाठीच असतात त्याची मोदी, शाह, फडणवीसांना एवढी भिती का आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संविधानिक संस्थांवर दबाव असल्याचा सपकाळांचा आरोप

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्व संविधानिक संस्थांवर ताबा मिळवून लोकशाही हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु आहे. संविधानिक संस्था विद्यापीठात संघ आणि भाजपाशी संबंधित माणसे घुसवली असून त्या एकप्रकारे ताब्यात घेतल्या आहेत. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला नोटीसही पाठवत नाही. न्यायपालिकेत भाजपा सरकारचा हस्तक्षेप प्रचंड वाढला आहे, हे निवृत्त न्यायाधीशच उघडपणे सांगत आहेत.निवडणूक आयोगाचा कारभार तर आंनदी आनंदच आहे,” असे म्हणत त्यांनी संविधानिक संस्थांवरदेखील प्रश्न उपस्थित केले.

“भारतीय जनता पक्षाने संविधान बदलण्यासाठीच लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. सत्तेत आल्यावर संविधान बदलू असे भाजपच्या अनेक नेत्यांनी जाहीर सभांमधून सांगितले होते हे फडणवीस सोयीस्कररित्या विसरले आहेत,” असे ते म्हणाले.

“मोदी-शाहांना राहुल गांधींची भीती वाटते”

“विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हातातील लाल कव्हरचे संविधान भाजपाला का खटकते? भाजपाने लाल रंगाचा इतका धसका का घेतला आहे? राहुल गांधी हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानच दाखवत आहेत. भाजपाची आगपाखड ही त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने होत आहे, त्यांची चोरी पकडल्याने ते आकांडतांडव करत आहेत.”

“राहुल गांधी ‘किस खेत की मुली’, म्हणता मग इतका तिळपापड कशासाठी? कोण राहुल? येथून सुरु झालेला प्रवास आता मोदी-शाह यांच्या सत्तेला हादरे देऊ लागला आहे. मोदी-शाह यांना झोपतही राहुल गांधीच दिसू लागले आहेत आणि भितीने ते घाबरले आहेत,” असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Sanjay Raut : फडणवीसांच्या ‘चीन फंडिंग’ आरोपांवरून महाराष्ट्रात रणकंदन! संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर काय आरोप केला?

    Ans: भाजपच्या तोंडात संविधान आणि मनात मनुस्मृती असल्याची टीका करत सपकाळ यांनी भाजप आणि RSS यांच्यावर संविधानविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला.

  • Que: १३ कोटी मतदारांच्या मुद्द्यावर हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

    Ans: निवडणूक प्रक्रियेतून १३ कोटी नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. घुसखोरांच्या नावाखाली सामान्य नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ नये, असंही ते म्हणाले.

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना कोणतं आव्हान दिलं?

    Ans: घुसखोरांचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या फडणवीसांनी किती घुसखोर पकडले, याची आकडेवारी जाहीर करावी, असं आव्हान सपकाळ यांनी दिलं.

Web Title: Harshvardhan sapkal attack bjp devendra fadnavis vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Sanjay Raut : अमित शाहांना गृहमंत्रिपदावरून हटवा! संजय राऊतांची मोदींकडे मोठी मागणी; 13 कोटी घुसखोरांच्या मुद्द्यावरून थेट सवाल
1

Sanjay Raut : अमित शाहांना गृहमंत्रिपदावरून हटवा! संजय राऊतांची मोदींकडे मोठी मागणी; 13 कोटी घुसखोरांच्या मुद्द्यावरून थेट सवाल

Sanjay Raut : फडणवीसांच्या ‘चीन फंडिंग’ आरोपांवरून महाराष्ट्रात रणकंदन! संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं
2

Sanjay Raut : फडणवीसांच्या ‘चीन फंडिंग’ आरोपांवरून महाराष्ट्रात रणकंदन! संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं

Amit Shah : खऱ्या संसदेत राहुल गांधींचा नंबर कधीच लागणार नाही; अमित शाहांचा घणाघात
3

Amit Shah : खऱ्या संसदेत राहुल गांधींचा नंबर कधीच लागणार नाही; अमित शाहांचा घणाघात

Rahul Gandhi INDIA Alliance Rally : दिल्लीत मोठं शक्तिप्रदर्शन, 20 विरोधी पक्ष एकत्र, राहुल गांधी काय म्हणाले?
4

Rahul Gandhi INDIA Alliance Rally : दिल्लीत मोठं शक्तिप्रदर्शन, 20 विरोधी पक्ष एकत्र, राहुल गांधी काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.