Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राम मंदिरातील देणग्यांवर दरोडा’; मोदी, RSS आणि ट्रस्टवर हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी

राम मंदिरातील देणगी गैरव्यवहाराच्या कथित प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकार आणि RSS वर निशाणा साधला. मुख्य आरोपींना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jun 26, 2026 | 06:51 PM
Harshvardhan Sapkal

Harshvardhan Sapkal

Follow Us
Follow Us:
  • राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहारावर हर्षवर्धन सपकाळ यांचा मोदी सरकार आणि RSS वर गंभीर आरोप
  • मुख्य आरोपींना संरक्षण देऊन कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचा दावा
  • सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी आणि आर्थिक व्यवहारांचा खुलासा करण्याची मागणी
 

मोघलांनी देशातील मंदिरे लुटली, सोमनाथचे मंदिर मोहमद गझनीने लुटले पण सध्या मंदिर लुटणारे स्वकीयच निघाले. भाजपा व त्यांच्या बगलबच्च्यांनी चक्क मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामालाच लुटले आहे. हा सर्व प्रकार तळपायाची आग मस्तकात जाणारा आहे, पण रामाच्या व हिंदूच्या नावावर राजकारण करणारा भाजपा व रा. स्व. संघाचा एकही नेता या दरोड्यावर बोलत नाही. प्रभू रामाला भक्तीभावाने दान-देणग्या देणाऱ्या भाविकांचा हा घोर अपमान आहे.हिंदूंचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या बदमाशांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

राम मंदिर देणगी प्रकरणावर काँग्रेसची आक्रमक भूमिका

राम मंदिरातील देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या प्रवृत्तींचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की,अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणग्यांमध्ये झालेल्या चोरी व पैशाच्या अफरातफरी प्रकरणात चौकशीदरम्यान राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रमुख चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. पण या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही किंवा त्यांना अटकही केली नाही. या प्रकरणी मुख्य आरोपींना सोडून इतर आठ छोट्या कर्मचा-यांवर चोरी आणि कट रचल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सुत्रधारांना मोकाट सोडून मोदी सरकार “चोर सोडून संन्यासाला फाशी” देण्याच्या प्रयत्न करत आहे.

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची छी-थू होतेय’; प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात, स्मार्ट मीटरवरही सरकारला सवाल

‘मुख्य सूत्रधारांना संरक्षण, कर्मचाऱ्यांवर कारवाई’

सपकाळ पुढे म्हणाले की, राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त चंपत राय यांचे लागेबांधे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आहेत, परंतु त्यांनाच मोकळे सोडून अटक केलेल्यांमध्ये दान मोजणी करणारे कर्मचारी, मोजणी प्रक्रियेचे प्रमुख, प्रक्रियेवर देखरेख करणारे निवृत्त बँकर आणि राम मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त चंपत राय यांचे चालक व विश्वासू रामाशंकर यादव (उर्फ ‘तिन्नू’) यांचा समावेश आहे. घोटाळा करणारे निकटवर्तीय मोकाट आणि कर्मचा-यांना अटक हे म्हणजे “मोदी है तो मुमकीन है!’’ असा प्रकार आहे.

घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी, सर्व विश्वस्त पंतप्रधान मोदी,आरएसएस, भाजपाशी संबंधित

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशभरातील अनेक भाविक भक्तांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी सोने आणि चांदीच्या विटा, हि-याचे दागिने चंपत राय यांच्याकडे दिल्याचे लोक आता समोर येऊन सांगत आहे. सिंधी समाजाने २०० किलो चांदीच्या विटा दिल्या आहेत. पण त्यांना साधी पावतीही मिळाली नाही. रामाच्या नावाने लोकांनी श्रध्देपोटी दिलेल्या शेकडो हजारो कोटी रुपयांची रोख रक्कम, दागिने, सोने-चांदीच्या विटा, हि-याचे हार, दागिने याचा कोणताही हिशोब ट्रस्ट सार्वजनिक करत नाही त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे असे दिसते. राम मंदिर ट्रस्टचे सर्व विश्वस्त हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाशी संबंधित आहेत. त्यामुळेच या घोटाळेबाजांवर अद्याप कारवाई केली जात नाही.

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

असंख्य रामभक्तांच्या भावना दुखावणाऱ्या या घोटाळ्याप्रकरणी कलम ३०६, ३१६(५), ३१७(४), ३१७(५), ६१ आणि ३(५) नुसार सौम्य गुन्ह्यांचा एफआयआर (FIR) दाखल झालेला आहे. वास्तविक पाहता सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सदर प्रकरणाचा तटस्थ आणि निष्पक्ष तपास झाला पाहिजे. मोदी सरकारमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तरी त्यांनी ताबडतोब सदर चौकशी लावावी, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताबडतोब नोंदणी करून त्यांचा अंकेक्षण अहवाल देखील जाहीररित्या प्रकाशित करावा असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Harshvardhan sapkal ram mandir donation case pm modi rss allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • Ayodhya ram mandir
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
1

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
2

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Maharashtra Drought : ‘दुष्काळ जाहीर केला, आता भरीव मदतीचा मुहूर्त कधी?’ हर्षवर्धन सपकाळांची सरकारकडे मोठी मागणी
3

Maharashtra Drought : ‘दुष्काळ जाहीर केला, आता भरीव मदतीचा मुहूर्त कधी?’ हर्षवर्धन सपकाळांची सरकारकडे मोठी मागणी

राम मंदिरातील दानचोरी प्रकरणातील ‘ते’ रहस्य अखेर उलगडले; SBI कर्मचाऱ्याने…
4

राम मंदिरातील दानचोरी प्रकरणातील ‘ते’ रहस्य अखेर उलगडले; SBI कर्मचाऱ्याने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.