Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटाच्या आमदारांची आज ‘मातोश्री’वर महत्त्वपूर्ण बैठक; बैठकीत नेमकं काय घडणार?

आमदार आणि खासदारांनंतर आता ही पडझड महाराष्ट्र विधान परिषदेपर्यंतही पोहोचली आहे. या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुखांनी आपल्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 07, 2026 | 07:55 AM
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज 'मातोश्री'वर महत्त्वपूर्ण बैठक; पक्षफुटीच्या भीतीचे चर्चा?

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज 'मातोश्री'वर महत्त्वपूर्ण बैठक; पक्षफुटीच्या भीतीचे चर्चा?

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत फूट पडल्याचे पाहिला मिळाल आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत पक्षाला रामराम केला. असे असताना आता शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष सातत्याने कमकुवत होत चालला आहे.

आमदार आणि खासदारांनंतर आता ही पडझड महाराष्ट्र विधान परिषदेपर्यंतही पोहोचली आहे. या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुखांनी आपल्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आमदारांची ही आपत्कालीन बैठक आज, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीचा मुख्य अजेंडा काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या या बैठकीचा मुख्य उद्देश नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणे आणि इतर नेत्यांना पक्ष सोडण्यापासून रोखणे हा आहे.

तसेच, राज्य विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यासाठी पक्षाची रणनीती अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या बैठकीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे.

आता ‘ऑपरेशन टायगर-३’ ची भीती?

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केला आहे की, ‘ऑपरेशन टायगर ३.०’ आधीच सुरू झाले असून, १४ आमदार उपमुख्यमंत्र्यांच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे इतर ज्येष्ठ नेते, ज्यामध्ये मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे, त्यांनी अधिकृतपणे अशा कोणत्याही ऑपरेशनचा इन्कार केला आहे.

‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’; मुख्यमंत्र्यांचा टोला

अयोध्या राम मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुरू केलेल्या ‘रामरक्षा आंदोलना’बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांना अखेर प्रभू रामाची आठवण झाली, याचा आनंद व्यक्त करत फडणवीस म्हणाले की, रामाच्या मार्गावर चालणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.

ऑपरेशन टायगर 3 कधी होईल, तेही कळणार नाही

ऑपरेशन टायगर 3 कधी होईल, तेही कळणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झंझावातात अनेक आमदार आणि माजी मंत्री शिवसेनेत येणार आहेत. केंद्रात शिवसेनेचा चेहरा कोण असेल, याचा निर्णय शिंदे साहेब राजकीय परिस्थितीनुसार घेतील. ठाकरे गट काय करतो यापेक्षा आमचा भर संघटना अधिक मजबूत करण्यावर आहे, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.

‘एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल’; रामदास आठवलेंचा दावा, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला

Web Title: Important meeting of thackeray faction office bearers is taking place at matoshree today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 07:54 AM

Topics:  

  • Shivsena Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.