Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल’; रामदास आठवलेंचा दावा, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. 'एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल,' असा दावा त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jul 04, 2026 | 08:50 PM
'एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल'; रामदास आठवलेंचा दावा, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला

'एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल'; रामदास आठवलेंचा दावा, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला

Follow Us
Follow Us:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील घडामोडी आणि आगामी राजकीय समीकरणांवर भाष्य करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. “एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल,” असा दावा करत त्यांनी २०१९ मध्ये महायुतीसोबत न येण्याचा निर्णय ही त्यांची चूक असल्याचे म्हटले. सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

‘२०१९ मध्ये आमच्यासोबत आले असते तर…’

रामदास आठवले म्हणाले, “हे टायगर ऑपरेशन नाही, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस नाही, हे तर उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन झालं आहे. आज आमदार-खासदार आमच्याकडे येत आहेत. २०१९ मध्येच आम्ही उद्धव ठाकरेंना आमच्यासोबत येण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी तो स्वीकारला नाही. ती त्यांची चूक होती आणि त्यामुळेच आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे.”

‘तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय?’ अमित साटम वादावरून राज ठाकरेंचं फडणवीसांना खुलं पत्र; ‘लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांवर कारवाई करा’

आदित्य ठाकरेंवरही निशाणा

आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असल्याचा दावा केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना आठवले म्हणाले, “सरकारचं नव्हे, तर आदित्य ठाकरे यांचंच हे शेवटचं अधिवेशन आहे. ही त्यांची शेवटची आमदारकी असेल.”

यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघाचाही उल्लेख करत, “वरळीत त्यांना निवडून आणण्यात आमचाही वाटा होता,” असा दावा केला.

‘रामरक्षा आंदोलनाऐवजी शिवसेना रक्षा आंदोलन करा’

अयोध्येतील राम मंदिरातील चोरीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी राज्यभर ‘रामरक्षा महाआरती’ आंदोलनाची घोषणा केली आहे. यावर टीका करत रामदास आठवले म्हणाले, “रामरक्षा महाआरती करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेना रक्षा आंदोलन’ करायला हवं.”

‘काही लोक घरात बसून पोस्ट लिहितात’; राज ठाकरेंच्या टीकेला अमित साटम यांचा पलटवार, ‘फेक नरेटिव्ह पसरवून मला टार्गेट केलं जातंय’

पुढे त्यांनी खोचक सल्ला देत म्हटले, “उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाकडे आपल्या पक्षातील एकही आमदार फुटू नये, अशी प्रार्थना करावी.”

दरम्यान, रामदास आठवले यांच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली असून त्यांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Ramdas athawale on uddhav thackeray and aditya thackeray sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • AadityaThackeray
  • Ramdas Aathvale
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात
1

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
2

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
3

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
4

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.