Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ऑपरेशन टायगर 3 कधी होईल तेही कळणार नाही’; ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात येणार? शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचे मोठे विधान

'ऑपरेशन टायगर 3 कधी होईल तेही कळणार नाही,' असे विधान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jul 04, 2026 | 09:53 PM
‘क्रोकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

‘क्रोकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Follow Us
Follow Us:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अलीकडील राजकीय घडामोडींनंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. काही खासदारांनी पक्ष सोडल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे दावे सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांकडून केले जात आहेत. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांनी ‘ऑपरेशन टायगर 3’ संदर्भात मोठे विधान केले आहे. पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना आबिटकर यांनी आगामी काळात आणखी राजकीय घडामोडी होण्याचे संकेत दिले.

‘ऑपरेशन टायगर 3 कधी होईल तेही कळणार नाही’

ऑपरेशन टायगरच्या चर्चेबाबत विचारले असता प्रकाश आबिटकर म्हणाले, “ऑपरेशन टायगर 3 कधी होईल, तेही कळणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झंझावातात अनेक आमदार आणि माजी मंत्री शिवसेनेत येणार आहेत.”

ते पुढे म्हणाले, “केंद्रात शिवसेनेचा चेहरा कोण असेल, याचा निर्णय शिंदे साहेब राजकीय परिस्थितीनुसार घेतील. ठाकरे गट काय करतो यापेक्षा आमचा भर संघटना अधिक मजबूत करण्यावर आहे.” मात्र, आबिटकर यांनी कोणते आमदार किंवा नेते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, याबाबत कोणतीही नावे जाहीर केली नाहीत.

‘एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल’; रामदास आठवलेंचा दावा, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबतही दिली माहिती

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबतही प्रकाश आबिटकर यांनी माहिती दिली. “धावपळीमुळे शिंदे साहेबांना काहीसा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र ते सतत काम करणारे नेते आहेत. सध्या त्यांना काही दिवस आरामाची गरज आहे,” असे ते म्हणाले.

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला पुन्हा उधाण

यापूर्वीही शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी ‘ऑपरेशन टायगर’ सुरू असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता प्रकाश आबिटकर यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

उद्धव ठाकरेंना रामरक्षा नाहीतर पक्षरक्षा आंदोलनाची गरज; रामदास आठवले यांची टीका

दरम्यान, ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेकडून केला जात असला, तरी याबाबत संबंधित आमदार किंवा ठाकरे गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या दाव्यांबाबत पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Prakash abitkar on operation tiger 3 eknath shinde shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • Prakash Abitkar
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
1

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
2

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’
3

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’

Amravati MLC Election 2026: महायुतीत बंडाचा झेंडा! अमरावती शिक्षक मतदारसंघातून श्रीकांत देशपांडेंचे दोन अर्ज; ‘तिकीट न मिळालं…’
4

Amravati MLC Election 2026: महायुतीत बंडाचा झेंडा! अमरावती शिक्षक मतदारसंघातून श्रीकांत देशपांडेंचे दोन अर्ज; ‘तिकीट न मिळालं…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.