Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Alliance Rally 1 November: ‘इंडिया’ आघाडीच्या रॅलीत CJP सहभागी होणार; आशुतोष रांका, राहुल गांधीं काय म्हणाले?

INDIA Alliance Rally: रॅलीच्या तयारीसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया ब्लॉकची बैठक झाली. प्रियांका गांधी यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. इंडिया आघाडी आणि सीजेपी कडून सातत्याने एसआयआर प्रक्रियेतील गैरव्यहारांविरोधात आंदोलने केली जात आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 29, 2026 | 05:45 PM
INDIA Alliance Delhi Chalo Rally, Rahul Gandhi Ramlila Maidan Rally

INDIA Alliance Delhi Chalo Rally, Rahul Gandhi Ramlila Maidan Rally

Follow Us
Follow Us:
  • १ नोव्हेंबरला इंडिया आघाडीचा भव्य ‘दिल्ली चलो’ मोर्चा.
  • कॉकरोच जनता पार्टीचा (CJP) रॅलीला पाठिंबा; प्रवक्ते आशुतोष रांका यांची घोषणा.
  • “लाठीचार्जला घाबरू नका- राहुल गांधींचे तरुणांना आवाहन
India Alliance Rally 1 November: कॉकरोच जनता पार्टीने (CJP) इंडिया आघाडीच्या १ नोव्हेंबरच्या रॅलीला पाठिंबा दर्शवला आहे. राहुल गांधी यांनी विद्यार्थी संघटनांना १ नोव्हेंबरच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, “पोलिसांच्या लाठीचार्जची चिंता करू नका. घाबरण्याची गरज नाही.” असंही त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सीजेपीलाही या रॅलीत सहभागी होण्याबाबत प्रश्न विचारले जात आहे. यावर प्रवक्ते आशुतोष रांका यांनी उत्तर दिले आहे.

आशुतोष रांका म्हणाले की, पक्षाचे समर्थक रामलीला मैदानावर होणाऱ्या रॅलीत सहभागी होऊ शकतात. सीजेपीने इंडिया आघाडीच्या रॅलीत सामील होण्याचे संकेतही दिले असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अभिप्राय मागवले जात आहेत.

MLC Election Results 2026: पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीला फटका? आनंद परांजपेंचा पलटवार

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया ब्लॉकची बैठक

दरम्यान, रॅलीच्या तयारीसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया ब्लॉकची बैठक झाली. प्रियांका गांधी यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. इंडिया आघाडी आणि सीजेपी कडून सातत्याने एसआयआर प्रक्रियेतील गैरव्यहारांविरोधात आंदोलने केली जात आहेत. दोन्ही पक्षांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरु लागली आहे.

इंडिया ब्लॉकच्या नेत्यांनी गुरुवारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे.

राहुल गांधी  म्हणाले की, हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षासाठी नाही, तर भारताचा आत्मा वाचवण्यासाठी आहे. हा मोर्चा भारतीय संविधान आणि राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आहे. १ नोव्हेंबरचा मोर्चा लोकशाही वाचवण्यासाठी, मतचोरी रोखण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी आहे. जर कोणाला वाटत असेल की देशाची लोकशाही, संविधान, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे, तर त्यांनी या मोर्चात सामील व्हावे.” असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे..

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सार्वजनिक महाभियोग

विरोधी आघाडी ‘इंडिया आघाडीकडून ‘ शुक्रवारी दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सार्वजनिक महाभियोग कार्यक्रम आयोजित करणार आहे. राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते यात सहभागी होतील. इतर ठिकाणी परवानगी न मिळाल्याने, हा कार्यक्रम आता दुपारी ३:३० वाजता १० राजाजी मार्ग येथे आयोजित केला जाईल. हा कार्यक्रम १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या विरोधी पक्षाच्या सभेच्या आधी होईल.

Navnath Ban Accuses Eknath Shinde: शिंदे सेनेने पाठीत खंजीर उपसला! भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे गंभीर आरोप

सार्वजनिक महाभियोगामध्ये, जनता किंवा राजकीय पक्ष घटनात्मक पद धारण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आंदोलन करतात. याद्वारे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जनदबाव निर्माण केला जातो.

एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधी पक्षांकडून ६ सभा आणि निदर्शने

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ६ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ८ निदर्शने केली. तर ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि डाव्या पक्षांनीही १० ऑक्टोबर रोजी याच मुद्द्यावर निदर्शनाचे आवाहन केले होते, परंतु दिल्ली पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही. या काळात शहरात बॅरिकेड्स लावण्यात आले, ४५ मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आणि ७,००० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत कोणते आंदोलन आयोजित केले आहे?

    Ans: १ नोव्हेंबर रोजी इंडिया आघाडी आणि सीजेपी पक्षाच्या वतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर 'लोकशाही व संविधान रक्षणासाठी' 'दिल्ली चलो' मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

  • Que: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) या मोर्चाबाबत काय म्हणणे आहे?

    Ans: सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, पक्षाचे समर्थक रामलीला मैदानावरील रॅलीत सहभागी होतील आणि पक्षाकडून सहभागाबाबत कार्यकर्त्यांचा अभिप्राय घेतला जात आहे.

  • Que: राहुल गांधी यांनी या मोर्चाबाबत देशातील तरुणांना काय आवाहन केले आहे?

    Ans: राहुल गांधी यांनी तरुणांना पोलिसांच्या लाठीचार्जला न घाबरता लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: India alliance delhi chalo rally nov 1 cjp supports rahul gandhi appeal as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Mallikarjun Kharge
  • National Politics
  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘…त्यांची बुद्धी किती आहे, हे दिसून आले’; मल्लिकार्जुन खरगेंवर Mangal Prabhat Lodha यांचा निशाणा
1

‘…त्यांची बुद्धी किती आहे, हे दिसून आले’; मल्लिकार्जुन खरगेंवर Mangal Prabhat Lodha यांचा निशाणा

Mallikarjun Kharge remark on PM Modi : खरगेंच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं! श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
2

Mallikarjun Kharge remark on PM Modi : खरगेंच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं! श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

Rahul Gandhi: अमित शाह यांच्यावरील वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींना दिलासा; सुलतानपूर न्यायालयाने केले निर्दोष मुक्त
3

Rahul Gandhi: अमित शाह यांच्यावरील वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींना दिलासा; सुलतानपूर न्यायालयाने केले निर्दोष मुक्त

Rahul Gandhi convoy Accident:  पूर्वांचल द्रुतगती मार्गावर राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांची टक्कर, दोघे जखमी 
4

Rahul Gandhi convoy Accident: पूर्वांचल द्रुतगती मार्गावर राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांची टक्कर, दोघे जखमी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.