Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला

India Allience : केंद्र सरकारने जंतर-मंतरचे नाव आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळले आहे. केंद्राचा हा निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांना पटला नसून त्यांनी याबाबत केंद्राला उपरोधिक टोलाही लगावला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 12, 2026 | 03:41 PM
India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला

Follow Us
Follow Us:
  • आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतर-मंतर वगळले
  • केंद्राच्या निर्णयाला इंडिया आघाडीचा टोला
  • सीजेपीकडून ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी
 

गृहमंत्रालयाने जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास बंदी घातली असून त्याऐवजी इतर तीन जागांची निवड केली आहे. या नव्या तीन जागांमध्ये रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदानाचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर मात्र इंडिया आघाडी (India Allience)च्या नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारची घाबरगुंडी उडालीय, हे यातून स्पष्ट होते असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, पक्ष जो निर्णय घेईल, तेच होईल. तर काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले की, यातून हे स्पष्ट होते की, केंद्र सरकार घाबरले आहे. त्यांना लोकांचा आवाज दाबायचा आहे, पण लोकशाहीत जनतेचा आवाज केव्हाच दाबता येत नाही. आमचे आंदोलन सुरूच राहिल.
तसेच काँग्रेसचे खासदार इमरान मसूद हे जंतर-मंतरचे नाव आंदोलन स्थळ यादीतून वगळल्यानंतर उपरोधिकपणे म्हणाले की, मग आता आम्ही हिमालयाचे शिखर गाठत तेथे आंदोलन करणार.

…तोपर्यंत आम्ही मागे फिरणार नाही

सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, इतकी वर्षे आंदोलनासाठी निश्चित असलेली जागा, ती आपण अशाप्रकारे अचानक बंद करता. तर आता देशातील प्रत्येक शहर, प्रत्येक टोक जंतर-मंतर बनेल. जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही मागे फिरणार नाही.
तसेच काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी म्हणाले की, आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढा देत आहोत. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे की, लोकशाहीची रक्षा करणे आणि निवडणूक व्यवस्था पारदर्शक बनवण्याची ही लढाई आहे. या लढाईत, आम्ही प्रत्येक चौक, प्रत्येक टोकापर्यंत जाऊ ज्यामुळे लोकशाही ओळखली जाते. त्यातीलच एक स्तंभ सर्वोच्च न्यायालयही आहे.

Rahul Gandhi PC: तुमच्या सरकारमधील २०० अधिकारी आमच्या संपर्कात, सगळी माहिती … राहुल गांधीचा गौप्यस्फोट

तेजस्वी यादवांचाही निर्णयाला विरोध

बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, आम्हीच सर्वात आधी एसआयआरविरोधात लढाई सुरू केली होती. त्याची सुरुवात बिहारमधून झालेली. आता सर्व सत्य समोर आले आहे. लोकशाहीवर हल्ले होत असून ती पायाखाली तुडवली जात आहे. हे सर्व पाहता आम्ही गप्प बसणार नाही.

तर दुसरीकडे, काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला म्हणाले की, आम्ही सीजेआयने सांगितलेल्या अनेक गोष्टीनुसार पुढे गेलो व याचिका दाखल केल्या. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे. तसेच काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले की, हे आंदोलन तर अनेक दिवसांपासून सुरू आहे. राहुल गांधी यांनी जेव्हा इंदिरा गांधी भवनात पहिल्यांदा एसआयआरचा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हापासून हा विषय देशभरात गाजत आहे.

काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई म्हणाले की, भाजप घाबरलं आहे. त्यांना ठाऊक आहे की, आता त्यांच्याकडे जास्त काळ सत्ता राहणार नाही. त्यामुळे ते आता त्यांना हवे ते निर्णय घेत आहेत.

Ramdas Athawale: ज्ञानेश कुमार प्रकरणावरून राजकारण तापले! विरोधकांच्या सुप्रीम कोर्ट मोर्चाआधी रामदास आठवलेंचे मोठे विधान

Web Title: India allience slams centre jantar mantar protest venue change rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Gyanesh Kumar
  • Jantar Mantar

संबंधित बातम्या

New Delhi : आता जंतर-मंतर नाही, तर ‘या’ ठिकाणी करावं लागणारं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
1

New Delhi : आता जंतर-मंतर नाही, तर ‘या’ ठिकाणी करावं लागणारं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?
2

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?

Ramdas Athawale: ज्ञानेश कुमार प्रकरणावरून राजकारण तापले! विरोधकांच्या सुप्रीम कोर्ट मोर्चाआधी रामदास आठवलेंचे मोठे विधान
3

Ramdas Athawale: ज्ञानेश कुमार प्रकरणावरून राजकारण तापले! विरोधकांच्या सुप्रीम कोर्ट मोर्चाआधी रामदास आठवलेंचे मोठे विधान

INDIA Alliance Supreme Court March: ज्ञानेश कुमारांविरोधात विरोधक आक्रमक!;  महाराष्ट्रातील १०० हून अधिक नेते दिल्लीत दाखल
4

INDIA Alliance Supreme Court March: ज्ञानेश कुमारांविरोधात विरोधक आक्रमक!; महाराष्ट्रातील १०० हून अधिक नेते दिल्लीत दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.