
Rahul Gandhi Press Conference, Rahul Gandhi On Gyanesh Kumar,
गेल्या पाच सहा दिवसांपासून विरोधी इंडिया आघाडीचे नेते सातत्याने दिल्लीत जोरदार आंदोलन करत आहेत. काल-परवा झालेल्या सीजेपीच्या आंदोलनातही विद्यार्थी, मुक्त पत्रकार आणि आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना जोरदार मारहाण करण्यात आली. विरोधी इंडिया आघाडीने देशातील या परिस्थितीसाठी थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांना भेटण्यासाठी वेळ मागितली. पण त्यानंतरही विरोधी पक्षांना भेटण्यास सुर्यकांत यांनी नकार दिला. यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप सरकार आणि निवडणूक आयुक्तांवर पुन्हा आगपाखड केली आहे.
आमची इच्छा आहे की इतके पोलिस रस्त्यांवर उतरावेत, ही आमची रनणीती आहे. आम्ही लोकांना दाखवू इच्छितो की,पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना वाचवत आहेत. एकीकडे आम्ही त्यांचा राजीनामा मागत आहोत. पण त्यांनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा आहे. ते जितके त्यांना वाचवतील तितक्या लवकर आम्ही त्यांच्या कंट्रोलरपर्यंत पोहचू.
देशभरातून दिल्लीत येणाऱ्या महत्त्वाच्या सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या, दिल्लीत ५६ मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आले. दिल्लीत येणाऱ्या रस्त्यांवर कडेकोट नाकाबंदी करण्यात आली. आमची लढाई लोकशाही आणि न्यायासाठी आहे. तरीही देशाची राजधानीत आज एवढी मोठी तटबंदी का करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या आणि आमच्या आंदोलनात महिलांना, विद्यार्थींनींना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुंड मारहाण करत आहेत. रविवारी दिल्लीत विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन झाले. पण कालही विद्यार्थी आणि महिला, तरुणींना मारहाण झाली.
आमच्या रिपोर्टनुसार पोलिसही खूप नाराज आहेत. आमच्याकडून देशातील तरुणांना मारहाण का करवून घेतली जात आहे, असे प्रश्न पोलिस खात्यातूनच उपस्थित केलं जात आहेत. तरुणांना मारहाण करण्याचे आम्हाला आदेश दिले जात आहेत आणि दुसरीकडे आरएसएसच्या लोकांना मोकळ सोडण्यास सांगितले जात आहे. अशी कुजबूज गृहमंत्रालया, सीआरपीएफ, आयटीबीपी या खात्यांतून असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपचे गुंड आरएसएसचे गुंड महिलांना मारहाण करत आहेत. एकीकडे देशभक्त तरुणांना मारहाण करण्याचे आदेश दिले जात आहेत आणि दुसरीकडे भाजपच्या आरएसएसच्या गुंडांना सोडण्याच्या आणि आंदोलनातील विद्यार्थ्यांना या गुंडांकडून मारहाण करवली जात आहे. असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
यामुळे आम्हालाच फायदा होत आहे. ५० टक्के पोलिस आम्हाला म्हणत आहेत की तुम्ही करताय ते योग्य आहे, करत राहा. काराण आता पोलिस, देशाची जनता, सर्व विरोधी पक्ष एकाबाजूला आहेत. तर नरेंद्र मोदी अमित शाहा अजित डोवाल ज्ञानेश कुमार इसीमधील चार पाच लोक यांनी वोट चोरी केली आहे, ते एका दुसऱ्या बाजूला आहे.