Uday Samant advises Maratha leader Manoj Jarange Patil to exercise restraint while criticizing cm
नागपूर : राज्यामध्ये मागील दोन वर्षांपूर्वी मोठे भूकंप झाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये नाराजीचा पूर आला. महायुतीसह महाविकास आघाडीमधील अनेक नेते नाराज आहेत. निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भाजप किंवा शिंदे गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरु केले असून यामध्ये ठाकरे गटाचे नेत्यांचे पक्षप्रवेश करुन घेतले जाणार आहे. याबाबत आता शिंदे गटाचे नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केले आहे.
शिंदे गटाचे नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. उदय सामंत यांना माध्यमांशी संवाद साधताना लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिला एका महिन्यामध्ये 5 लाखांनी घसरल्यामुळे प्रश्न विचारण्यात आला. याबाबत ते म्हणाले की, “या योजनेत जे काही नियम दिले गेले आहे त्यामुळे ही घट झाली आहे. अनावधानाने किंवा नजरचुकीने योजनेच्या लाभामध्ये आलेल्या महिला किंवा भगिनी कमी झाल्या आहे. सरसकट लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,” असे स्पष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर अनेक आरोप केले आहे. यावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, “विजय वडेट्टीवार हे माझे राजकारणाच्या पलीकडचे चांगले मित्र आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे लोक चांगले नाही. आपल्या पक्षात प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात काय वाद सुरू आहे? हे अगोदर सोडवलं पाहिजे. उदय सामंत सोबत किती आमदार आहेत आमच्या पक्षात काय चाललंय हे त्यांनी पाहू नये. मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारणात आलो आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात कोणालाही त्रास होईल अशी कृती आमच्याकडून होणार नाही. आम्ही बालिश नाही त्यामुळे बालिश राजकारण कोणी करू नये,” असा खोचक टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांना लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राजकारणामध्ये लवकरच तिसरा भूकंप होणार असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाचे 9 खासदार हे शिंदे गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर देखील त्यांनी सूचक विधान केले. उदय सामंत म्हणाले की, “ऑपरेश टायगर मिशन हे सांगून राबविले जात नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याकरिता मिशन राबविण्याची गरज नाही. तर काही लोकांना कळून चुकलंय की बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारी शिवसेना ही शिंदेचीच आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार हे पण निश्चित आहे. मी 90 दिवसात ठाकरे गटासह आघाडी चे 10 ते 12 माजी आमदार यांचा प्रवेश होणार असं सांगितलं होतं आणि त्यावर मी आजही ठाम आहे. त्यांना कळून चुकले की उद्धव ठाकरे यांच्या पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांचा पक्ष संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहे,” असे सूचक विधान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.