Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election : महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस अखेर चव्हाट्यावर; काँग्रेसने दिला ‘हा’ इशारा

भाजप आणि महायुती सरकारच्या विरोधात एकजुटीने लढण्यासाठी सर्व विरोधकांची तयारी सुरू होती. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे मतदारांची म्हणजेच लोकप्रतिनिधींची संख्या सर्वाधिक होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2026 | 01:20 PM
Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका...

Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमधील अंतर्गत धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने अखेरच्या क्षणी नाट्यमयरीत्या माघार घेतल्यामुळे महायुतीचा मार्ग सुकर झाला. या संपूर्ण घटनाक्रमावर पुणे शहर काँग्रेसचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संताप व्यक्त केला असून, हा काँग्रेस पक्ष आणि मतदारांचा विश्वासघात असल्याची टीका केली आहे.

शहाराध्यक्ष जगताप म्हणाले की, या निवडणुकीत भाजप आणि महायुती सरकारच्या विरोधात एकजुटीने लढण्यासाठी सर्व विरोधकांची तयारी सुरू होती. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे मतदारांची म्हणजेच लोकप्रतिनिधींची संख्या सर्वाधिक होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही घटकांपेक्षा काँग्रेसची मतदारांची संख्या पुण्यात जास्त असल्यामुळे काँग्रेसने या जागेवर आपला हक्काचा दावा केला होता. या संदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी देखील स्थानिक पातळीवर सकारात्मक चर्चा झाली होती.

जागावाटपाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे आणि सातारा या दोनच जागांची मागणी लावून धरली. महाराष्ट्रातील एकूण १७ जागांपैकी आम्हाला फक्त पुणे आणि साताऱ्याची जागा देण्यात यावी, अशी आग्रही मागणी शरद पवार यांच्या पक्षाने केली. महाविकास आघाडीचा धर्म पाळला जावा आणि भाजपविरोधात एकजूट राहावी, या उद्देशाने काँग्रेसने अत्यंत मोठ्या मनाने आणि ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेतून आपली हक्काची पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडली होती, असे त्यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज मागे घेणे हा ‘विश्वासघात’

काँग्रेसने मैत्रीचा धर्म पाळत जागा सोडली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने अखेरच्या दिवशी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे हे बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

राष्ट्रवादीची अखेर माघार

राष्ट्रवादी काँग्रेसने आधी आग्रहाने या जागेचा फॉर्म भरला आणि गुरुवारी तो अखेर माघारी घेतला, हा काँग्रेस पक्षाचा विश्वासघात आहे. काँग्रेस पक्ष या जागेवर भाजपविरोधात ताकदीने लढून मतदारांना एक सकारात्मक संदेश देणार होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीसमोर शरणागती पत्करली, अशा शब्दात जगताप यांनी संताप व्यक्त केला.

भविष्यात स्वबळावर लढणार

झालेला हा विश्वासघात केवळ काँग्रेस पक्षाचा नसून पुण्यातील मतदारांचाही आहे, असे मत जगताप यांनी व्यक्त केले. काँग्रेस नेत्यांपेक्षा मतदारांमध्ये या शरणागतीबद्दल जास्त संतप्त भावना आहेत. त्यामुळे भविष्यात काँग्रेस पक्ष कोणावरही अवलंबून न राहता स्वबळावर लढण्याचा निश्चितपणे नारा देईल, असा इशारा त्यांनी दिला. जर सहकारी पक्ष महायुतीसमोर असे सरेंडर होणार असतील, तर मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी काँग्रेसला स्वबळाचा मार्ग स्वीकारावाच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना…; काँग्रेसचा आरोप

Web Title: Internal discord within the maha vikas aghadi has finally come out into the open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Maharashtra Legislative Council
  • MLC Election
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Dry Day Maharashtra: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! दारूची दुकाने किती दिवस बंद राहणार? आज ४ वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी
1

Dry Day Maharashtra: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! दारूची दुकाने किती दिवस बंद राहणार? आज ४ वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी

Devendra Fadnavis : दहा हजार मते बाद, तर पदवी कोणी दिली? सांगलीत फडणवीसांचा शिक्षक-पदवीधरांना टोला
2

Devendra Fadnavis : दहा हजार मते बाद, तर पदवी कोणी दिली? सांगलीत फडणवीसांचा शिक्षक-पदवीधरांना टोला

Pune MLC Election : सोलापुरात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी! रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह
3

Pune MLC Election : सोलापुरात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी! रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह

Pune MLC Election : शरद पवारांचा नवा डाव? पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या व्यासपीठावर अन सोलापुरात राजकीय चर्चांना उधाण
4

Pune MLC Election : शरद पवारांचा नवा डाव? पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या व्यासपीठावर अन सोलापुरात राजकीय चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.