Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune MLC Election : शरद पवारांचा नवा डाव? पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या व्यासपीठावर अन सोलापुरात राजकीय चर्चांना उधाण

Pune MLC Election : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्याचे आमदार नारायण पाटील बार्शीतील भाजपच्या प्रचार मेळाव्यात दिसले. त्यांच्या उपस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा रंगली आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 18, 2026 | 08:46 PM
Sharad Pawar

Sharad Pawar

Follow Us
Follow Us:
  • नारायण पाटील भाजपच्या प्रचार मेळाव्यात उपस्थित
  • बार्शीतील मेळाव्यात दिग्गज नेत्यांची उपस्थिती
  • जयकुमार गोरेंचा मोठा दावा, राजकीय चर्चांना उधाण
 

Pune MLC Election : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच विषयाची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी चक्क भाजपच्या प्रचार मेळाव्याला हजेरी लावली आहे. नारायण पाटील या प्रचार मेळाव्यात दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, बार्शीत झालेल्या या मेळाव्यात त्यांना पहिल्या रांगेत स्थान मिळालं होतं. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी येथे भाजप-महायुतीचा प्रचार मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते.

भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नारायण पाटील यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार असल्याने त्यांच्या या उपस्थितीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष गेलं.

Rohit Pawar : ‘अजितदादांचा पक्ष सक्षम नाही, अर्थखातं फडणवीसांनी चोरलं,’ रोहित पवारांच्या विधानाने खळबळ

डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी मेळावा

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता जाधव, तर शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नारायण पाटील सहभागी झाल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

जयकुमार गोरेंचा मोठा दावा

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नारायण पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर आणि शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचाही भाजपला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया काय?

महाविकास आघाडीकडून पुणे पदवीधर मतदारसंघात सुनील मोदी आणि हर्षदा देशमुख हे दोन उमेदवार रिंगणात असल्याचा मुद्दा चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्यामुळे नारायण पाटील यांच्यात संभ्रम निर्माण झाला असेल आणि म्हणून ते भाजपच्या मेळाव्यात आले असतील, अशी टिप्पणी त्यांनी केली.

सोलापूरच्या राजकारणात पुढे काय?

नारायण पाटील यांची भाजपच्या व्यासपीठावरील उपस्थिती ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. याआधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांच्या भूमिकेची चर्चा झाली होती. आता पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांच्या उपस्थितीचा नेमका परिणाम काय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Eknath Shinde : ‘मी धाडस केलं नसतं तर…’ शिवसेना बंडखोरीची आठवण काढत एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला

Web Title: Narayan patil bjp support barshi pune mlc election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • BJP
  • MLC Election
  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar : ‘अजितदादांचा पक्ष सक्षम नाही, अर्थखातं फडणवीसांनी चोरलं,’ रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
1

Rohit Pawar : ‘अजितदादांचा पक्ष सक्षम नाही, अर्थखातं फडणवीसांनी चोरलं,’ रोहित पवारांच्या विधानाने खळबळ

40 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात भाजप आमदाराच्या भावाला उच्च न्यायालयाचा झटका; दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला!
2

40 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात भाजप आमदाराच्या भावाला उच्च न्यायालयाचा झटका; दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला!

Eknath Shinde : ‘मी धाडस केलं नसतं तर…’ शिवसेना बंडखोरीची आठवण काढत एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला
3

Eknath Shinde : ‘मी धाडस केलं नसतं तर…’ शिवसेना बंडखोरीची आठवण काढत एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला

Chandrakant Patil : ‘EVM असो वा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला
4

Chandrakant Patil : ‘EVM असो वा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.