कल्याण/भिवंडी : शिवसेना शिंदे गटाच्या भिवंडी लोकसभा विभागाची युवा सेनेची कार्यकारीणी जाहीर झाली आहे. ही कार्यकारिणी जाहिर झाल्यावर युवा सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. मंगेश गोडे असं या पदाधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकून त्यांनी नाराजी व्यक्त करीत राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. तर काहींची नाराजी असली तरी त्यांनी उघडपणे जाहिर केलेली नाही. इतकेच नव्हेत शिवसेना आमदार आणि शहर प्रमुखांच्या नातेवाईकांचे पद न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कल्याण पश्चिमेत भिवंडी लोकसभा मतदार संघाकरीता युवा सेना पदाधिकाऱ्यांची कार्यकारीणी जाहिर झाली आहे. युवा सेना सचिव किरण साळी आणि युवा सेना मुख्य सचिव राहूल लोंढे यांनी कार्यकारीणी जाहिर केली आहे. यामध्ये 12लोकांना पदे दिलेली आहे. ज्यामध्ये अभिषेक मोरे यांना कल्याण मुरबाड युवा सेना अध्यक्ष, भूषण तायडे जिल्हा उपाध्यक्ष, राज ठाकरे जिल्हा समन्वय अशी एकूण 12नावे आहेत. सुजित रोकडे युवा सेना अध्यक्ष या पदावर हाेते. त्यांना कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. ही कार्यकारीणी झाल्यावर मंगेश गोडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेश गोडे यांच्या राजीनाम्या संदर्भातील पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज युवा सेना कार्यकारीणी जाहिर झाली. नव्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन, पुढील वाटचाली करिता शुभेच्छा. आजच्या यादीत मलाही पदाची आपेक्षा होती. अनेक दिवस पक्षाची निष्ठेने सेवा केली. वरिष्ठाच्या आदेशाचे पालन केले. पण आज त्याचे फळ मिळाले. आजच्या यादीत माझे नाव नाही. मी माझ्या पदाचा राजीनामा देत असून यापूढे सर्व सामान्य कार्यकर्ता राहिन. जय महाराष्ट्र. मंगेश गोडे याच्या राजनाम्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांचे पुतणे योगेश पाटील आणि कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपूत्र वैभव भोईर यांना देखील पदे मिळणार होती. त्यांचीही नावे नाहीत. त्यामुळे ही नाराजी नाट्याचा काय परिमाण होतो. हेे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रकरणात जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी सांगितले की, कार्यकारीणी घोषित झाली. काम करणारे पदाधिकारी आहे. कोणत्याही प्रकारची नाराजी नाही.