शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी वडगाव मावळ न्यायालयात हजेरी लावली (फोटो - सोशल मीडिया)
Shrirang Barne affidavit News : वडगाव मावळ : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना वडगाव मावळ विशेष न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता 22 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणुकांच्या वेळी त्यांच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार अनिल भांगरे आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी न्यायालयाकडे केली होती. खासदार श्रीरंग बारणे यांनी २००९ आणि २०१९ च्या निवडणुकांदरम्यान नामनिर्देशन पत्रासोबत दिलेल्या शपथपत्रात जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता. खासदार श्रीरंग बारणे यांनी शैक्षणिक पातळीविषयी माहिती चुकीची दिली असल्याचा आरोप केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी शपथपत्रात खासदार श्रीरंग बारणे यांनी शैक्षणिक पात्रता ‘दहावी नापास’ अशी नमूद केली होती, तर २००९ मध्ये त्यांनी ‘दहावी उत्तीर्ण, सन १९८९’ असे लिहिले होते. याशिवाय, त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात पिंपरी न्यायालयातील एक प्रकरण आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा समावेश आहे.
न्यायालयाने शपथपत्रांमधील शैक्षणिक पात्रतेतील विसंगती आणि प्रलंबित प्रकरणांविषयी दिलेली अपुरी माहिती लक्षात घेतली. न्यायालयान याबाबत वडगाव मावळ पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पोलिसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानंतर डॉ. हरिदास यांनी युक्तिवाद केला. या निष्कर्षांच्या आधारे न्यायालयाने बारणे यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम १२५-अ अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यास पुरेशी कारणे असल्याचे नमूद केले असून त्याविरोधात प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
टायगर पॉईंट पर्यटन प्रकल्पाला गती
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात लोणावळा येथील कुरवंडे गावात प्रस्तावित टायगर पॉईंट प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रकल्पासाठी ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच ३३३ कोटी रुपयांची मान्यता मिळाली असून, पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मावळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. बैठकीत या प्रकल्पात प्रवेशद्वार, टिकीट घर, फूड कोर्ट, स्नॅक बार, वाहनतळ, कनिष्ठ समारंभ हॉल अशा सुविधा उभारल्या जाणार आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सायटसीईंग, झिप लाईन, बंजी जंपिंग, वॉल क्लायम्बिंग, फेरीस व्हील अशा साहसी खेळांचा समावेश करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे मनोरंजन व सुरक्षतेच्या दृष्टीने झुला, रेन डान्स, स्केटिंग रिंक, पाण्याची टाकी, सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना यांचा प्रकल्पात समावेश असून, उन्हाळ्यातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेवर विशेष भर दिला जाणार आहे.