Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शौर्यदिनानिमित्त अनुयायी पोहचले कोरेगाव भीमाला; प्रकाश आंबेडकर अन् रामदास आठवले यांंनी केले अभिवादन

आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. यामुळे कोरेगाव भीमा येथे अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे. त्याचबरोबर राजकीय नेते देखील अभिवादनासाठी येत आहेत. रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांनी देखील दर्शन घेतले आहे

  • By प्रीति माने
Updated On: Jan 01, 2025 | 12:45 PM
Koregaon Bhima 207th Shaurya Din Vijaystambh Ramdas Athawale and Prakash Ambedkar saluted

Koregaon Bhima 207th Shaurya Din Vijaystambh Ramdas Athawale and Prakash Ambedkar saluted

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कोरेगाव भीमाला 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. यासाठी विजयस्तंभला आकर्षक अशी सजावट केली असून लाखो अनुयायी अभिवादनासाठी येत आहे. विजयस्तंभाला खऱ्या व खोट्या अशा दोन्ही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी देखील कोरेगाव भीमा येथे दर्शन घेतले आहे.

कोरेगाव भीमा येथे मागील दोन दिवसांपासून अनुयायी मोठ्या संख्येने येत आहेत. राज्य सरकारकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच येणाऱ्या अनुयायी कोणत्याही व्यत्यय येऊ नये आणि प्रत्येकाला अभिवादन करता यावे यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. नेतेमंडळी देखील अभिवादनासाठी येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील शौर्यस्तंभाला अभिवादन केले आहे. यावेळी उपस्थितांसोबत त्यांनी संवाद साधला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मीडियावर पोस्ट करुन प्रकाश आंबेडकर शौर्यदिनाबाबत म्हणाले की, माझ्या प्रिय बांधवांनो, भीमा-कोरेगाव शौर्य दिवस हा आपल्या पूर्वजांच्या जातीय अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात एक पाऊल पुढे टाकण्याची आठवण आहे. 500 (499 महार आणि 1 मातंग) सैनिक आणि अलुतेदार सैन्याने त्यांच्या ब्राह्मणवादी पेशव्यांच्या शासकांवर केलेल्या विजयापासून प्रेरणा घ्या. त्यांच्या पराक्रमाची सकारात्मक आठवण ठेवा आणि बाबासाहेबांना जे हवे होते तेच स्वतंत्र आंबेडकरी राजकीय आकांक्षेचे प्रतीक म्हणून त्याचा वापर करा. आज आणि नजीकच्या काळात तुम्ही विजयस्तंभाला भेट द्याल तेव्हा सैनिकांचा सन्मान करा आणि बाबासाहेबांच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपले मत द्या – एक स्वतंत्र आंबेडकरवादी राजकीय शक्ती त्यातूनच उभी राहू शकते. जय भीम, अशा भावना प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील कोरेगाव भीमा येथे अभिवादन केले आहे. रामदास आठवले यांनी सर्व सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करुन विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून समाजातील सर्वांना आवाहन केले.

प्रशासन आणि पोलिसांची जय्यत तयारी

कोरेगाव भीमा पोलीसांचा चोख बंदोबस्त असून अनुयायींच्या सोयींसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. बंदोबस्तामध्ये पाच हजार पोलीस कर्मचारी, 750 पोलिस आधिकारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच एक हजार होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करत आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50 पोलिस टॉवर, 10 ड्रोन आणि चोरी रोखण्यासाठी विशेष पोलिस पथक आहे, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी शांतता राखण्यासाठी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची दंगल होऊ नये यासाठी सोशल मीडियावरही निर्बंध घालण्यात आले आहे. काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी जाहीर केले आहे.

Web Title: Koregaon bhima 207th shaurya din vijaystambh ramdas athawale and prakash ambedkar saluted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • Koregaon Bhima
  • Prakash Ambedkar
  • Pune
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
1

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन
2

Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन

गोखले बिल्डर-स्मारक ट्रस्टमधील व्यवहार; Pune कोर्टाने दिला ‘हा’ मोठा आदेश
3

गोखले बिल्डर-स्मारक ट्रस्टमधील व्यवहार; Pune कोर्टाने दिला ‘हा’ मोठा आदेश

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलाजवळील दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर
4

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलाजवळील दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.