• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Mns Leader Raj Thackeray Post For New Year 2025 Political News Update

राज ठाकरेंनी दिल्या नवीन वर्षानिमित्त ‘खास’ शुभेच्छा! मनसैनिकांनी दिला सूचक इशारा

नवीन वर्षाच्या सर्व नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील खास पोस्ट लिहून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 01, 2025 | 10:47 AM
'एकनाथ शिंदेंमुळेच मनसेची महायुतीसोबतची मैत्री फिस्कटली'; शिवसेनेनेही दिला इशारा

'एकनाथ शिंदेंमुळेच मनसेची महायुतीसोबतची मैत्री फिस्कटली'; शिवसेनेनेही दिला इशारा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : जगभरामध्ये नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले जात आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन आशा आकांशासह नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. सर्व क्षेत्रातील दिग्गज लोकांनी देखील 2025 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्टवर करुन नवीन वर्षांसाठी संकल्प सांगितले आहे.

2024मध्ये राज्यामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये मनसे पक्षाला मोठा धक्का मिळाला आहे. एकही आमदार न निवडून आल्यामुळे राज ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता त्यांनी नवीन वर्षासाठी राजकीय संकल्प केले असून त्यांनी याबाबत सूचक पोस्ट लिहिली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या नवीन वर्षाच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र,  सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळं युग वाटावं.

महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या २५ वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं. या २५ वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं. तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यान नोकरीच्या संधी मिळणं. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणं लावणं. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघणं. आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन. पण महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरु झाली, आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. आणि महागाईने लोकं होरपळली आहेत.

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र, सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीच… pic.twitter.com/T7Wp8WTHra — Raj Thackeray (@RajThackeray) January 1, 2025

असं असताना महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मी मागे म्हणलं तसं मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन, ते आपण करत आहोतच. पण राज्यात महिलांच्यावर जे अत्याचार होत आहेत, त्याच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरु करा. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा. आणि तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाना चांगलं फोडून काढा.

महागाईने होरपळलेल्याना दिलासा द्यायला हवा, यासाठी साठेबाजी होत नाहीये ना, हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्याना करा आणि त्याच्या जोडीला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आपल्या शाखा, कार्यालयं पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा. आणि हो, हे सगळं करताना सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रसारासाठी वापरायचा आहे पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना, त्याच्या अधीन जात नाही आहोत ना हे पहा.

लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच. तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा !

Web Title: Mns leader raj thackeray post for new year 2025 political news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • new year 2025
  • raj thackeray

संबंधित बातम्या

काँग्रेस मनसेसोबत युती करणार का? हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
1

काँग्रेस मनसेसोबत युती करणार का? हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

MNS-Mahavikas Aghadi Alliance: महाविकास आघाडीत मनसे सामील होणार की नाही…? वडेट्टीवारांनी दिले संकेत
2

MNS-Mahavikas Aghadi Alliance: महाविकास आघाडीत मनसे सामील होणार की नाही…? वडेट्टीवारांनी दिले संकेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अमेरिकेची मोठी कारवाई; भारतासह 7 देशांमधील 32 कंपन्यांवर निर्बंध, कारण काय तर..

अमेरिकेची मोठी कारवाई; भारतासह 7 देशांमधील 32 कंपन्यांवर निर्बंध, कारण काय तर..

Nov 13, 2025 | 07:14 AM
Grahan Yog 2025: केतू आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Grahan Yog 2025: केतू आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Nov 13, 2025 | 07:05 AM
‘या’ नवीन फीचर्ससह Tata Curvv आणि त्याचे Electric व्हर्जन झाले अपडेट, जाणून घ्या किंमत

‘या’ नवीन फीचर्ससह Tata Curvv आणि त्याचे Electric व्हर्जन झाले अपडेट, जाणून घ्या किंमत

Nov 13, 2025 | 06:15 AM
‘या’ बाईक्स दिसायला भारी पण Mileage च्या बाबतीत अत्याचारी!

‘या’ बाईक्स दिसायला भारी पण Mileage च्या बाबतीत अत्याचारी!

Nov 13, 2025 | 04:15 AM
महाराष्ट्रात श्वास घेणे अवघड! ‘या’ जिल्ह्यांत प्रदूषणाचे संकट गंभीर; धूलिकणांची पातळी….

महाराष्ट्रात श्वास घेणे अवघड! ‘या’ जिल्ह्यांत प्रदूषणाचे संकट गंभीर; धूलिकणांची पातळी….

Nov 13, 2025 | 02:35 AM
निवडणूक आयोग अन् राहुल गांधींमध्ये बिनसलं; प्रतिज्ञापत्र मागताच काढतात पळ

निवडणूक आयोग अन् राहुल गांधींमध्ये बिनसलं; प्रतिज्ञापत्र मागताच काढतात पळ

Nov 13, 2025 | 01:15 AM
अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार

अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार

Nov 12, 2025 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.