Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Politics : लालू प्रसाद यादवांना मोठा धक्का; कन्या रोहिणी यांनी राजकारण सोडत कुटुंबाशी तोडले संबंध

विरोधी महागठबंधनचा दारूण पराभव झाला. त्यात नामुष्की ओढवणाऱ्या पराभवानंतर लालू प्रसाद यांच्या कुटुंबात मोठी फूट पडली आहे. लालू प्रसाद यांना किडनी देणारी त्यांची मुलगी रोहिणी यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 16, 2025 | 11:47 AM
लालू कन्या रोहिणींचा राजकारणाला रामराम !

लालू कन्या रोहिणींचा राजकारणाला रामराम !

Follow Us
Follow Us:

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्यात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. मात्र, विरोधी महागठबंधनचा दारूण पराभव झाला. त्यात नामुष्की ओढवणाऱ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात मोठी फूट पडली आहे. लालू प्रसाद यांना किडनी देणारी त्यांची मुलगी रोहिणी यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.

रोहिणी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी राजकारण सोडत आहे. तसेच माझ्या कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडत आहे. संजय यादव आणि समीझ यांनी मला हे करण्यास सांगितले असून, मी सर्व दोष स्वतःवर घेत आहे.’ यापूर्वी २५ मे रोजी मोठा मुलगा तेज प्रतापला पक्ष आणि कुटुंबातून काढून असल्याचे टाकत लालूंनी जाहीर केले होते. त्यावेळीही तेज प्रताप यांनी संजय यादव यांना जबाबदार धरले होते आणि ‘जयचंदांनी आरजेडीला पोकळ केले आहे.’ असे लिहिले होते.

लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाला ७५ जागांवरून घसरून केवळ २५ जागांवर यावे लागले आहे. तेजस्वी यादव यांचा मानहानीकारक ५० हजार मतांनी पराभव झाला आहे. तर तेजस्वी यादव यांनाही विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. राजदला रामराम करण्यापूर्वी रोहिणी यांनी सोशल मीडियावर पक्षातील सर्व सदस्यांना आणि कुटुंबाला अगदी लालू आणि राबडीदेवींसह सर्वांना अनफॉलो केले होते. रोहिणींचे जाणे ही लालू यादव यांच्या कुटुंबासाठी नकारात्मक बाब आहे.

कोण आहेत संजय यादव?

ज्यांच्यामुळे लालूंच्या कुटुंबात फूट पडली ते आणि आज रोजी राष्ट्रीय जनता दलात सर्वांत प्रभावशाली ठरलेले संजय यादव आहेत तरी कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तेजस्वी आणि संजय यादव यांची भेट २०१२ च्या सुमारास दिल्लीतील एका क्रिकेट मैदानावर झाली होती व पुढे दोघांत मैत्री झाली. संजय यादव यांनी संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच ते डेटा अॅनासिस्ट आणि प्लानर व कन्सल्टंटही आहेत. २०१३ मध्ये लालू यादव यांना चारा घोटाळ्यात तुरुंगात टाकल्यानंतर तेजस्वी यादव पाटण्याला आले. त्यानंतर त्यांनी मित्र संजय यादव यांना पाटण्याला बोलावले. त्यानंतर ते तेजस्वी यादव यांना राजकीय मार्गदर्शन करू लागले.

हेदेखील वाचा : IRCTC Scam: आयआरसीटीसी घोटाळा काय आहे? या प्रकरणात किती पैशांचा गैरवापर झाला? वाचा सविस्तर

Web Title: Lalu yadav daughter rohini quits politics and breaks ties with family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • Bihar Politics
  • Lalu Prasad yadav
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.