Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निवडणूक आयोगाला सोट्याने हाणायला हवे’; काँग्रेसच्या ‘या’ पदाधिकाऱ्याचे खळबळजनक विधान

राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार होते. पण आदल्या दिवशी म्हणजे, 1 डिसेंबरला 24 नगराध्यक्ष आणि 150 हून अधिक नगरसेवकपदांसाठी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 02, 2025 | 09:31 AM
निवडणुकीची मतमोजणी आज होणार; राज्यातील जनतेचे लक्ष

निवडणुकीची मतमोजणी आज होणार; राज्यातील जनतेचे लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. परंतु, मतदानाच्या आदल्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगाने काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यात लातूरमधील निलंगा नगरपरिषदेचा समावेश असून, निवडणूक स्थगित केल्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाला सोट्याने हाणले पाहिजे, असे वक्तव्य लातूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी केले.

राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार होते. पण आदल्या दिवशी म्हणजे, 1 डिसेंबरला 24 नगराध्यक्ष आणि 150 हून अधिक नगरसेवकपदांसाठी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली. आता ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार असून त्याचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही टीका केली आहे.

निलंगा नगरपरिषदेची निवडणूक ऐनवेळी स्थगित करण्यात आली. यामुळे काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यांचे कार्यकर्ते आणि उमेदवार संतप्त झाले आहे. निलंग्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत जोरदार आंदोलन करण्यात आले. प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, सर्व नियमांचे पालन करून निवडणूक प्रक्रिया पार पडली जात असते. मात्र, ऐनवेळी असा निर्णय कसा येऊ शकतो?, असा सवाल आंदोलनकत्यांनी उपस्थित केला.

हेदेखील वाचा : Maharashtra Local Body Elections : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय हा अतिशय चुकीचा आहे. निवडणूक आयोगाला सोट्याने हाणले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे यांनी दिली. भाजपा आणि निलंगाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना पराभव समोर दिसत असल्यामुळेच ऐनवेळी असा प्रकार ते करू शकतात, असा आरोपही त्यांनी केला.

शेकडो उमेदवारांना बसला फटका 

या निर्णयाचा शेकडो उमेदवारांना फटका न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेल्या काही प्रभागातल्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला. या निर्णयाचा फटका शेकडो उमेदवारांना बसला, राज्यातील 24 नगराध्यक्षपदाच्या तर तब्बल 731 प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला, काही ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर हा निर्णय कोर्टाने घेतला.

Web Title: Latur congress district president abhay salunkhe made an offensive statement about election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • Congress Politics
  • Election Commission
  • Local Body Election

संबंधित बातम्या

BMC Election 2026: मतदान की थट्टा? मतदार याद्यांचा घोळ आणि पुसली जाणारी शाई; राजनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
1

BMC Election 2026: मतदान की थट्टा? मतदार याद्यांचा घोळ आणि पुसली जाणारी शाई; राजनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

निवडणूक आयोगाचा आणखी एक डाव! EVM मशीनला जोडलं नवीन मशीन, विरोधकांचा चढला पारा
2

निवडणूक आयोगाचा आणखी एक डाव! EVM मशीनला जोडलं नवीन मशीन, विरोधकांचा चढला पारा

महापालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; पण तरीही उमेदवारांना ‘असा’ करता येणार प्रचार
3

महापालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; पण तरीही उमेदवारांना ‘असा’ करता येणार प्रचार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला ३,००० रुपये मिळणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर
4

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला ३,००० रुपये मिळणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.