
१७ राज्यांमध्ये आता 'एसएसआर'ची घोषणा
विशेष पुनरावलोकन मोहीम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, बंगाल, तामिळनाडू, गुजरात, केरळ, छत्तीसगड, आसाम, गोवा, मणिपूर, पुदुचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार बेटांमध्ये राबवली जाईल. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर सध्या सुरू आहे किंवा नुकतीच पूर्ण झाली आहे, तेथे एसएसआरचे वेळापत्रक नंतर स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल. आयोगाचा हा निर्णय आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दरम्यान, ४०३ सदस्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ मे २०२७ मध्ये संपत आहे. पंजाब (११७ जागा), उत्तराखंड (७० जागा), गोवा (४० जागा) आणि मणिपूर (६० जागा) या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळही मार्च २०२७ मध्ये संपत आहे.
वगळलेले नाव पुन्हा नोंदवण्याची संधी
प्रारूप मतदारयादीतून नावे वगळलेल्यांना पुन्हा पुरावे सादर करून मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करण्याची संधी असतानाही बहुतांश मतदारांमध्ये मात्र याबाबत अनास्था दिसून येत आहे. एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा जिल्ह्यात सध्या दुसरा टप्पा सुरु आहे. या टप्यात प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. नावे वगळलेल्यांना नोटीसा बजावून तसेच विशेष शिबिरे घेऊनही मतदार प्रतिसाद देत नसल्याने बीएलओंपुढे कामे पूर्ण कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
FAQ
कोणत्या राज्यांना SSR मधून वगळले?
उत्तर : जिथे SIR सुरू आहे किंवा नुकतीच संपली आहे असे आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दिल्ली यांसारख्या राज्यांना वगळले.
माझे नाव SIR मध्ये वगळले असेल तर काय करावे?
उत्तर : Draft यादीत नाव तपासा. नसेल तर Form 6 भरून पुन्हा नोंदणी करा. पुरावे – Aadhaar, जन्म दाखला. पालकांचा जुना दाखला आता SSR मध्ये मागितला जाणार नाही असे ECI ने संकेत दिले आहेत.
बिहार SIR मध्ये काय झाले?
उत्तर : बिहारमध्ये SIR जून-सप्टेंबर 2025 मध्ये झाली. आधी मतदार – 7.9 कोटी SIR नंतर – 7.41 कोटी (48 लाख नावे कमी – वाद सुरू) आता Oct 2026 ला पुन्हा – 7.55 कोटी (14 लाख नावे पुन्हा वाढली)