Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Election 2025: नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन प्रक्रियेत बदल; ऑफलाइन अर्जाची सुविधा

नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५, दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 27, 2025 | 05:21 PM
Local Body Election 2025:

Local Body Election 2025:

Follow Us
Follow Us:
  • नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय
  • थेट अध्यक्षपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
  • सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑफलाईन नामनिर्देशनाला परवानगी
Local Body Election 2025: आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारांना आता ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवारसह सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश जारी केले आहेत. राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायती, तसेच थेट अध्यक्षपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन प्रक्रियेत केलेला हा बदल उमेदवारांना मोठी दिलासा देणारा ठरणार आहे.

Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत नाराजी; 

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑफलाईन नामनिर्देशनाला परवानगी

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट अध्यक्षपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्याची सुविधा आधीच उपलब्ध करून दिली होती. मात्र, अनेक राजकीय पक्ष आणि इच्छूक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.

या मागणीचा क्षेत्रीय पातळीवर आढावा घेतल्यानंतर आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेत ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच सुट्टीच्या दिवशीही दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५, दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान,  राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ६६४ उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी पूर्ण केल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर;

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्यासाठी आयोगाने https://mahasecelec.in हे विशेष संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागातील एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्रे भरता येतात. ऑनलाइन फॉर्म पूर्ण केल्यानंतर त्याची मुद्रित प्रत काढून स्वाक्षरीसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत प्रत्यक्ष जमा करणे बंधनकारक आहे.

 

Web Title: Local body election 2025 offline application facility for nomination process for municipal council nagar panchayat elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • Marathi News
  • nagar panchayat elections

संबंधित बातम्या

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
1

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
2

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
3

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट
4

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.