भाषासक्तीवर मोठे विधान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गुरुवारी (२४ जुलै) दिल्लीतील जेएनयू येथील मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती केंद्राच्या उद्घाटन समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलांना संबोधित केले. या दरम्यान, त्यांनी मराठी भाषेबाबत सुरू असलेल्या वादावरही एक महत्त्वाचे विधान केले आहे. या कार्यक्रमाला SFI ने विरोध केला होता. मात्र तरीही देवेंद्र फडणवीसांचा हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी हिंदी आणि मराठी भाषेच्या विवादावरदेखील चर्चा केली आणि आपले मत मांडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मराठी व्यक्ती संकुचित मानसिकता बाळगू शकत नाही आणि मातृभाषेचा आदर करण्यासोबतच इतर भारतीय भाषांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे’ हे विधान अशा वेळी आता समोर आले जेव्हा महाराष्ट्रात त्रिभाषिक सूत्र आणि हिंदी लादण्यावरून राजकीय आणि सामाजिक वादविवाद सुरू आहेत.
भाषा हे संवादाचे माध्यम आहे, मतभेदांचे नाही – देवेंद्र फडणवीस
JNU येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, “भाषा हे संवादाचे माध्यम आहे, मतभेदांचे नाही. मराठीचा अभिमान स्वाभाविक आहे, परंतु सर्व भारतीय भाषांचा आदर करणे देखील आवश्यक आहे.” PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात सांगितले की महाराष्ट्र सरकारचे भाषा धोरण मराठीला तसेच इतर भारतीय भाषांना समान दर्जा देते. संत ज्ञानेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार उद्धृत करताना ते म्हणाले की मराठी संस्कृती कधीही संकुचिततेच्या बाजूने नव्हती.
JNU यूमध्ये दोन विशेष केंद्रांचे उद्घाटन
देवेंद्र फडणवीस यांनी जेएनयू कॅम्पसमध्ये ‘कुसुमाग्रज मराठी भाषा केंद्र’ आणि ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षा आणि धोरणात्मक अभ्यास केंद्र’चे उद्घाटन केले. त्यांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची घोषणाही केली, ज्याला जेएनयूचे कुलगुरू शांतीश्री धुळीपुरी पंडित यांनी सहमती दर्शविली आहे.
तसंच अलिकडेच त्रिभाषा सूत्र लागू झाल्यानंतर राज्यात निदर्शने सुरू झाली, जिथे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने “हिंदी लादण्याचा” आरोप केला. या मुद्द्यावरील निषेधामुळे सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि बराच काळ वेगळे असलेले ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले.
कार्यक्रमापूर्वी SFI कार्यकर्त्यांनी निषेध केला
कार्यक्रमापूर्वी, फडणवीस यांना जेएनयू कॅम्पसमध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) कार्यकर्त्यांच्या निषेधाचा सामना करावा लागला. असे असूनही, त्यांनी स्पष्टपणे आपले विचार मांडले, भाषिक ऐक्य आणि सहिष्णुतेवर भर दिला. त्यामुळे आता यावर अधिक वाद घडणार की असणारा वाद मिटणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांनी यावेळी आपले विचार स्पष्ट मांडत पुन्हा एकदा मराठी लोकांचे मन जिंकले आहे.
‘आम्ही निवडणूक आयोगाला सोडणार नाही’; बिहार मतदार यादी फेरपडताळणीवरून राहुल गांधींचा इशारा