Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक गुंठ्यासाठी गोळीबार, बाप-लेकाचा तरुणावर हल्ला; पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे केवळ एक गुंठा जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 07, 2026 | 01:16 PM
एक गुंठ्यासाठी गोळीबार, बाप-लेकाचा तरुणावर हल्ला; पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

एक गुंठ्यासाठी गोळीबार, बाप-लेकाचा तरुणावर हल्ला; पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:
  • एक गुंठ्यासाठी गोळीबार
  • बाप-लेकाचा तरुणावर हल्ला
  • पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार
सासवड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे केवळ एक गुंठा जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

शुक्रवारी (दि. ६) पहाटे घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, सासवड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पिता- पुत्रांना अटक केली आहे. याप्रकरणी विकी मुरली राजपूत (वय ३०) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड (वय २७) व त्याचे वडील उत्तरसिंग रामकुमार राठोड (वय ५५, दोघे रा. भोसे, ता. खेड) यांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी यांच्या नावावर चाकण व वाकड येथे प्रत्येकी एक गुंठा जमीन आहे. यापैकी एक गुंठा जमीन नावावर करून देण्यासाठी आरोपी वारंवार दबाव टाकत होते. मात्र फिर्यादीने नकार दिल्याने ४ फेब्रुवारी रोजी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. शुक्रवारी पहाटे आरोपी उदाचीवाडी येथे फिर्यादीच्या घरी आले. शिवीगाळ करत दरवाजा उघडण्याची धमकी देत पिस्तुलातून दोन राऊंड फायर केल्याचा आरोप आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी जागे झाल्यानंतर आरोपी चारचाकी वाहनातून पसार झाले. भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर व पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटात तणावाचे वातावरण

भरचौकात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

जालना येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील मंगळ बाजार चौकासमोर शुक्रवारी घडली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव शाहेद सगीर शेख असे आहे. या खुनाच्या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे. शाहेद शेख याचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. आपआपसातील भांडणातून एक ते दोन जणांनी शाहेद शेख याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात शाहेद शेख गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर शाहेद शेख याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

Web Title: A shocking incident has taken place in purandar taluka where a youth was attacked by two men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Purandar News

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.