Congress Leader Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार
मिळालेल्या माहितीनुसार, बेगुसराय जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गौरव कुमार हे पापरौर येथील वैयक्तिक काम आटोपून बेगुसरायकडे परतत होते. त्यांची गाडी पापरौर स्मशानभूमीजवळ पोहोचताच दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. गाडीला सात गोळ्या लागल्या. गोळीबार थांबल्यानंतर गौरव कुमार झिरोमाईल सहायक पोलीस ठाण्यात परतले आणि त्यांनी हल्ल्याची माहिती पोलिसांना दिली.
नागपुरातच होणार हिवाळी अधिवेशन; 7 ते 18 डिसेंबरपर्यंत वेळापत्रक ठरले
गौरव कुमार यांच्या म्हणण्यानुसार, दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला आणि हल्ल्यानंतर ते बेगुसरायच्या दिशेने पळून गेले. आपण त्यांना ओळखू शकले नाही. त्यानंतर ओपी प्रमुख मनीष कुमार यांनी गौरव कुमार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच, हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असल्याचे सांगितले आहे.
गौरव कुमार हे बेगुसराईचे ज्येष्ठ राजकारणी अनिल सिंह यांचे पुत्र आहेत. हल्ल्याच्या वेळी सफारी कारमध्ये चालकासह तीन जण होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोळीबारादरम्यान गौरव कुमार गाडीतून निसटण्यात यशस्वी झाले आणि थेट सिंघौल पोलीस ठाण्यात गेले, जिथे त्यांचा जीव वाचला.
South Korea 2026: AI कॉपी रोखण्यासाठी दक्षिण कोरियाचा अनोखा फंडा! चष्म्यापासून ते कपड्यांच्या
दरम्यान, काँग्रेस नेत्यावरील हल्ल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सदर-२ डीएसपी कुमारी दुर्गा शक्ती पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि त्यांनी आवश्यक कारवाई केली. जमिनीच्या वादातून काँग्रेस नेत्यावर हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पण हल्ल्याचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. या गुन्हेगारी घटनेनंतर पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. गोळीबारात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना ओळखण्याचे काम ते करत आहेत.
Ans: बेगुसराय जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गौरव कुमार यांच्या सफारी कारवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे.
Ans: राष्ट्रीय महामार्ग ३१ वरील पापरौर स्मशानभूमीजवळ गौरव कुमार यांच्या कारवर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात कारला सात गोळ्या लागल्या.
Ans: ओपी प्रमुख मनीष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव कुमार यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.






