Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar Allegations On SIR Campaign:आपले, संदिग्ध अन् विरोधी!.. भाजपच्या त्या सॉफ्टवेअरबाबत रोहित पवारांचे खळबळजनक ट्विट

Rohit Pawar: भाजपने गावपातळीवरील मतदारांसाठी एक अॅप किंवा एक वेबसाईट तयार केले असून या माध्यमातून मतदारांची वर्गवारी करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्विटर एक्सवर एक पोस्ट शेअर करत यांसंबंधी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 05, 2026 | 01:18 PM
Rohit Pawar, BJP,Maharashtra Politics, SIR Campaign,

Rohit Pawar, BJP,Maharashtra Politics, SIR Campaign,

Follow Us
Follow Us:

Rohit Pawar Allegations On SIR Campaign: महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून विशेष सघन पुनरीक्षण (SIR) मोहिम सुरू आहे. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील मतदारांची पडताळणी आणि नाव नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. घरोघरी जाऊन केली जाणारी ही पडताळणी प्रक्रिया 8 ऑगस्ट रोजी संपणार होती. पण निवडणूक आयोगाने या मोहिमेला 17 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. प्रशासकीय यंत्रणेवरील ताण आणि नागरिकांची गरज लक्षात घेता एसआयआर प्रक्रिया १७ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.

राज्यात एसआयआर प्रक्रिया सुरू असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केले आहे. एसआयआर मोहिम सुरू असतानाच भाजपने आपली समांतर यंत्रणा कामाला लावली असल्याच आहे. भाजपने गावपातळीवरील मतदारांसाठी एक अॅप किंवा एक वेबसाईट तयार केले असून या माध्यमातून मतदारांची वर्गवारी करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्विटर एक्सवर एक पोस्ट शेअर करत यांसंबंधी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Rohit Pawar Health Update: प्रकृती अस्वस्थ्यामुळे रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ

काय म्हटलं आहे रोहित पवारांनी ट्विटमध्ये ?

“SIR मोहिम हे एक भयानक प्रकरण असून या माध्यमातून विरोधी विचारांच्या मतदारांची नावे कशी वगळली गेली किंवा भलत्याच ठिकाणी कशी दाखवली गेली हे प. बंगालमध्ये अवघ्या देशाने पाहिलं. एकीकडं हे SIR प्रकरण गाजत असताना आता दुसऱ्या बाजूला भाजपानेही गावपताळीवर आपल्या BLA मार्फत स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली असून त्यांना दिलेल्या लिंकमध्ये मतदारांची पडताळणी केली जाते आणि ही पडताळणी करताना या लिंकमध्ये मतदारांच्या नावापुढे १. आपले २. संदिग्ध ३. विरोधी असे तीन पर्याय दिलेले आहेत. यापैकी एका पर्यायाची निवड करुन मतदारांची वर्गवारी करण्याचं काम सुरु आहे.

यामुळं काही प्रश्न निर्माण होत आहेत.
१.शासकीय यंत्रणा SIR मोहिम राबवत असेल तर त्याच वेळी भाजपनेही आपली समांतर यंत्रणा या कामी कशी लावली?

२.संदिग्ध आणि विरोधी विचारांच्या मतदारांची नावे वगळण्याचा किंवा त्यांना भलत्याच ठिकाणी दाखवण्यासाठी तर हे केले जात नाही ना?

३.कोणत्याही राजकीय पक्षाला मतदारांच्या वैयक्तिक किंवा गोपनीय रेकॉर्ड्चा वापर करुन स्वतःची समांतर राजकीय मोहिम चालणण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असं कोर्टाने सांगितलं असतानाही भाजप हे कोणत्या अधिकारात करत आहे?

या प्रश्नांची उत्तरं भाजपाने द्यावीत आणि निवडणूक आयोगानेही याची गंभीर दखल घ्यावी..!

SIR मोहिम हे एक भयानक प्रकरण असून या माध्यमातून विरोधी विचारांच्या मतदारांची नावे कशी वगळली गेली किंवा भलत्याच ठिकाणी कशी दाखवली गेली हे प. बंगालमध्ये अवघ्या देशाने पाहिलं. एकीकडं हे SIR प्रकरण गाजत असताना आता दुसऱ्या बाजूला भाजपानेही गावपताळीवर आपल्या BLA मार्फत स्वतंत्र यंत्रणा… pic.twitter.com/W8sVqd6O6p — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 4, 2026

‘भाजपाची डेडलाईन जवळ आली’; प्रशांत किशोरांच्या विजयावर रोहित पवारांचा हल्लाबोल

रोहित पवार यांनी या ट्विटसोबत काही फोटोदेखील शेअर केले आहेत. भाजपने त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक सॉफ्टवेअर बनवले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भाजप मतदारांची माहिती गोळा करत आहेत. यात तीन पर्याय देण्यात आले आहेत. यानुसार संबंधित मतदार हा आपल्या विचारांचा आहे का, संदिग्ध आहे का की पूर्णपणे विरोधी विचारांचा आहे. त्याला एकतर यादीतून वगळले जाऊ शकते. यात भाजपच्या विरोधी विचारांचे मतदार असतील त्यांना विरोधी यादीत टाकले जाईल. त्याचे नाव यादीतून वगळले जाईल किंवा त्याला मतदान करू दिले जाणार नाही. हे लोकशाही विरोधी आहे. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title: Maharashtra news rohit pawar allegations bjp parallel system voter sir campaign extension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 01:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.