Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde Shivsena News: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत

एकीकडे शिंदे इतर पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे, आपल्याच पक्षातील नेत्यांचा रोष दूर करणे हे येत्या काळात त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान ठरू शकते.

  • By anuradha sagar
Updated On: May 06, 2026 | 02:41 PM
Shaina NC, Eknath Shinde, Shiv Sena, Sunetra Pawar, NCP Ajit Pawar, Maharashtra Politics, MLC Election,

Shaina NC, Eknath Shinde, Shiv Sena, Sunetra Pawar, NCP Ajit Pawar, Maharashtra Politics, MLC Election,

Follow Us
Follow Us:
  • विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शायना एन.सी. नाराज
  • सुनेत्रा पवार यांच्या भेटीमुळे त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता
  • प्रवक्त्या म्हणून टीव्ही चॅनेलवर पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारा एक महत्त्वाचा चेहरा
 

Shaina NC Eknath Shinde: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार आणि खासदारांच्या संपर्कात असून, त्यामुळे विरोधी पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. पण दुसरीकडे मात्र, खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्या आणि प्रवक्त्या शायना एन.सी. पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांनी राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शायना एन.सी. या मूळच्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय नेत्या होत्या पण भाजपमध्येच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. पण विधानसभा निवडणुकीच्या दोन वर्षे आधी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्या. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून तिकीटही दिले. परंतु निवडणुकीच्या निकालात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. असे असतानाही त्यांनी टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये आणि सार्वजनिक मंचांवर शिवसेनेचा आक्रमकपणे बचाव करताना दिसल्या.

Operation Tiger : राज्यात ‘ऑपरेशन टायगर’चा थरार? संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

विधान परिषदेच्या उमेदवारीवरून असंतोष

वृत्तानुसार, शायना एनसी यांच्या असंतोषाचे मुख्य कारण विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. शिवसेना आपल्याला विधान परिषदेसाठी उमेदवारी देईल अशी त्यांना मोठी आशा होती, पण त्यांना या निवडणुकीत उमेदवारी डावलली गेली. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. राजकीय तज्ज्ञांच्या मते, पक्षात दुर्लक्षित झाल्याची भावना असल्याने त्या आता नवीन पर्याय शोधत असल्याची चर्चा आहे.

सुनेत्रा पवार यांच्यासोबत भेट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

दरम्यान, शायना एनसी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची औपचारिक भेट घेतली. तेव्हा या अटकळांना आणखी जोर आला. या भेटीमुळे त्या लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (एनसीपी) सामील होऊ शकतात, अशी शक्यात निर्माण झाली आहे. असे झाल्यास, शिंदे गटासाठी हा एक मोठा संघटनात्मक धक्का असेल.

WB Assembly Election 2026: ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; महेश जेठमलांनीनी सांगितली कायदेशीर प्रक्रिया

शिवसेनेपुढील वाढती आव्हाने

शायना एनसी यांचे पक्षातून बाहेर पडणे हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी वैयक्तिक धक्का असेल, कारण त्या मुंबईत एक सुशिक्षित आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणून पक्षाचे प्रतिनिधित्व करत होत्या. एकीकडे शिंदे इतर पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे, आपल्याच पक्षातील नेत्यांचा रोष दूर करणे हे येत्या काळात त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान ठरू शकते.

 

Web Title: Major blow to eknath shinde shaina nc likely to quit shiv sena over mlc nomination row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Kailas Patil on Opreation Tiger: मला फुटायचे असते तर सुरत बॉर्डरवरून परतलोच नसतो ! कैलास पाटलांनी स्पष्टचं सांगितलं
1

Kailas Patil on Opreation Tiger: मला फुटायचे असते तर सुरत बॉर्डरवरून परतलोच नसतो ! कैलास पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ‘ऑपरेशन टायगर 2.0’मुळे ठाकरे गटाला धक्का; आणखी 14 आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा
2

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ‘ऑपरेशन टायगर 2.0’मुळे ठाकरे गटाला धक्का; आणखी 14 आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’
3

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार
4

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.