Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का; फक्त दोन जागांवर विजय तर नागपूरची जागा काँग्रेसने जिंकली

आरएसएसच्या मुख्यालयात काँग्रेसचा झेंडा फडकवत वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. ४८ तासांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 29, 2026 | 07:28 AM
विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक
  • भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून दोन जागा
  • काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीने तीन जागा जिंकल्या
नागपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीने सत्ताधारी महायुती सरकारला मोठा धक्का दिला आहे. राज्यातील पाच जागांसाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीनंतर, भाजप-शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेतृत्वाखालील विरोधी महाआघाडीने तीन जागा जिंकल्या, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालांची आठवण करून देणारे आहे.

भाजपच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी सुशिक्षित मतदारांचे बंड महाराष्ट्रात सुरू झाले आहे. भाजपने महाराष्ट्रातील तीनपैकी दोन पदवीधर जागांवर निवडणूक लढवली आणि दोन्ही गमावल्या, तर अजित गटाला एकमेव जागेवर पराभवाचे तोंड बघावे लागले. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी महाराष्ट्रातील सर्वांत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघावर पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताब्यात असलेली ही जागा भाजप जवळपास ५२ वर्षांपासून जिंकत होता. मागील निवडणुकीत वंजारी यांनी येथे भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला होता.

यावेळीही, आरएसएसच्या मुख्यालयात काँग्रेसचा झेंडा फडकवत वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. ४८ तासांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. ३५ व्या एलिमिनेशन फेरीनंतर, भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आपला पराभव मान्य केला आणि वंजारी यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. कोटा पूर्ण झाला नसला तरी, सवाधिक मते मिळाल्याच्या आधारावर गुरुवारी वंजारी यांना विजयी घोषित केले जाईल.

भाजपच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का

पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवामुळे भाजपच्या प्रतिष्ठाला मोठा धक्का बसला, महाआघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी भाजपच्या उमेदवार स्मिता योगेश जाधवांवर मात केली, नागपूरपाठोपाठ पुण्यातही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला, शरद पवार गटाच्या या विजयामुळे भाजपच्या आगामी राजकीय रणनीतीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

अमरावतीत शिंदेंचे सरनाईक विजयी

विदर्भातील अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. अंतिम मतमोजणीत सरनाईक यांना १६,६६३ मते मिळाली, काँग्रेसच्या अदिती पोहरे ८.६३६ मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिल्या.

पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख यांचा विजय

पूर्ण शिक्षक मतदारसंघात दोन माजी आमदारांचा पराभव करत भाजप‌चे उमेदवार कौस्तुभ गावडे विजयी झाले, त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार आसगावकर जयंत यांना पराभूत केले. पुणे पदवीधरमध्ये हर्षद देशमुख यांचा विजय झाला.

FAQ

प्रश्न 1: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत किती जागांसाठी मतदान झाले?
उत्तर: एकूण पाच जागांसाठी मतदान झाले. यामध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश होता.

प्रश्न 2: महायुतीला किती जागा मिळाल्या?
उत्तर: उपलब्ध अंतिम निकालांच्या वृत्तानुसार महायुतीने दोन जागा जिंकल्या.

प्रश्न 3: नागपूरची जागा कोणत्या पक्षाने जिंकली?
उत्तर: काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव केला.

Web Title: Major setback for the mahayuti in legislative council elections won only two seats nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 07:28 AM

Topics:  

  • MLC Election
  • political news

संबंधित बातम्या

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत
1

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत

Pune Graduate Election : मतमोजणी केंद्रावर मतपेट्यांच्या सीलवर आक्षेप! ‘हा लोकशाहीचा सरळसरळ खून,’ हर्षवर्धन सपकाळ संतापले
2

Pune Graduate Election : मतमोजणी केंद्रावर मतपेट्यांच्या सीलवर आक्षेप! ‘हा लोकशाहीचा सरळसरळ खून,’ हर्षवर्धन सपकाळ संतापले

जंगलतोडीवर खासदार संजय राऊत आक्रमक; म्हणाले, ‘…असे कृत्य राक्षसच करू शकतो’
3

जंगलतोडीवर खासदार संजय राऊत आक्रमक; म्हणाले, ‘…असे कृत्य राक्षसच करू शकतो’

Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी 1 नोव्हेंबरला काढणार रॅली; भाजपला आता टेन्शन
4

Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी 1 नोव्हेंबरला काढणार रॅली; भाजपला आता टेन्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.