Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘थोडीशीही लाज उरली असेल तर अमित शाहांचा राजीनामा घ्या’; मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाई आणि आंदोलनकर्त्यांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमित शाह यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 31, 2026 | 04:23 PM
Mallikarjun Kharge, Rahul Gandhi, Haldwani, BJP,

Mallikarjun Kharge, Rahul Gandhi, Haldwani, BJP,

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थी आंदोलनावरून अमित शाहांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी
  • सरकारने आंदोलनकर्त्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप
  • सोशल मीडियावरील पोस्टद्वारे खरगेंचा मोदी सरकारवर निशाणा
 

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही त्याच मागणीची पुनरावृत्ती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत २० जुलै रोजी दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापराचा उल्लेख केला. सरकारने विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

‘आधी हाडं मोडलात, आता FIR दाखल करताय’; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

नेमकं काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे ?

खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “दहा दिवसांपूर्वी, तुमच्या सरकारने काठ्या, दंडुके आणि पेलेट गनच्या साहाय्याने तरुणांचा आवाज दाबला. जेव्हा विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले, तेव्हा तुम्ही आता सूड म्हणून त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करत आहात आणि त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेत आहात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही या अटीवर तरुणांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. आता, तुमचे सरकार आपल्याच शब्दावरून फिरले आहे,” असे ते म्हणाले.

.@narendramodi जी, 10 दिन पहले, आपकी सरकार ने युवाओं का लाठी-डंडे-Pellet Gun से दमन किया। जब छात्रों ने अपना आंदोलन वापस ले लिया तो अब आप बदले की भावना से उनपर FIR करवा रहें हैं, जबरन हिरासत में ले रहें हैं। युवाओं ने आंदोलन इस शर्त पर वापिस लिया कि उनपर कार्रवाई नहीं होगी,… — Mallikarjun Kharge (@kharge) July 31, 2026

महिला आंदोलनकर्त्यांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याचा दावा

याशिवाय काही आंदोलनकर्त्यांची सोशल मीडिया खाती बंद केली जात असल्याचा तसेच काही महिला आंदोलनकर्त्यांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याचा दावाही खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला. या घडामोडींमुळे सरकार सूडाच्या भावनेने कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, “त्यांची सोशल मीडिया खाती ब्लॉक केली जात आहेत आणि मुलींची वैयक्तिक माहिती उघड केली जात आहे. तुमचा अहंकार इतका वाढला आहे की, गृहमंत्री अमित शाह यांनी संसद भवनात पाऊलही ठेवले नाही आणि उत्तरदायित्वावर विधान करण्यास ते घाबरले. आता, तुमची इज्जत वाचवण्याचे आणि प्रतिमा जपण्याचे हे सर्व डावपेच चालणार नाहीत; तरुणांनी तुमचे खरे रूप पाहिले आहे.”

Sanjay Raut PC: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले; संजय राऊतांचा घणाघात

अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणावर संसदेत निवेदन दिले नसल्याचाही मुद्दा उपस्थित करत खरगे म्हणाले की, आता प्रतिमा वाचवण्याचे प्रयत्न उपयोगाचे ठरणार नाहीत. देशातील तरुणांना वास्तव समजले असून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

पोस्टच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून, “थोडीशीही लाज उरली असेल तर अमित शाह यांचा राजीनामा घ्या,” अशी मागणी केली. या वक्तव्यानंतर विद्यार्थी आंदोलन, आंदोलनकर्त्यांवरील कारवाई आणि केंद्र सरकारची भूमिका या मुद्द्यांवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Mallikarjun kharge demands amit shah resignation over student action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Amit Shah
  • CJP Protest
  • Mallikarjun Kharge
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
1

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
2

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना
4

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.