Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?

Manoj Jarange Patil : मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा पोलिसांकडे अर्ज केला आहे. पोलिसांनी याआधी दोनदा परवानगी नाकारली होती. आता 20 अटी मान्य करत जरांगेंनी तिसऱ्यांदा अर्ज केल्याने परवानगी मिळणार का, याकडे लक्ष लागलं आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 14, 2026 | 09:45 PM
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Follow Us
Follow Us:
  • दोनदा परवानगी नाकारल्यानंतर जरांगेंचा तिसऱ्यांदा अर्ज
  • पोलिसांच्या 20 अटी मान्य करण्याची तयारी
  • आझाद मैदानात उपोषणाला परवानगी मिळणार का?
 

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असून, आज त्यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस आहे. दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याच्या निर्णयावर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, त्यांच्या मुंबईतील उपोषणाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. पोलिसांनी यापूर्वी दोन वेळा परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगे पाटील यांच्या वतीने तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे.

या नव्या अर्जामध्ये पोलिसांनी यापूर्वी ज्या कारणांवरून परवानगी नाकारली होती, त्या सर्व अटींचं पालन करण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी दर्शवली आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचं अर्जात नमूद करण्यात आलं आहे.

आंदोलन पूर्णपणे लोकशाही आणि घटनात्मक चौकटीत राहून करण्यात येईल. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची आयोजकांकडून पूर्ण काळजी घेतली जाईल, असंही अर्जात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Manoj Jarange Patil : ‘मंत्र्यांनी जरांगेंचे पाय चेपून द्यावेत’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात, म्हणाले ‘सरकारमध्ये दम नाही’

जरांगेंच्या अर्जातील 20 अटी

मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने पुन्हा एकदा परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. पोलिसांनी यापूर्वी दोन वेळा परवानगी नाकारल्यानंतर आता तिसऱ्यांदा अर्ज करताना पोलिसांनी घातलेल्या अटी मान्य करण्याची तयारी जरांगे पाटील यांनी दर्शवली आहे.

या अर्जामध्ये एकूण 20 अटी मान्य करण्यात आल्या आहेत. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन आयोजकांकडून देण्यात आलं आहे.

अर्जातील महत्त्वाच्या अटींनुसार, कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यास आंदोलनाची परवानगी दाखवण्यासाठी तिची मूळ प्रत सोबत बाळगण्यात येणार आहे. तसेच अर्जात नमूद करण्यात आलेल्या आंदोलकांच्या संख्येची मर्यादा कायम ठेवली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

आंदोलन शांततेत करण्याचं आश्वासन

आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीकडून चिथावणीखोर भाषण किंवा जमावाची भावना भडकवणारी वक्तव्ये केली जाणार नाहीत, असं आश्वासन देण्यात आलं आहे. याशिवाय आंदोलनस्थळी कोणत्याही प्रकारची वाहनं आणली जाणार नसल्याचं अर्जात नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये ट्रॅक्टर, ढकलगाडी (ट्रॉली), बैलगाडी, सायकल रिक्षा आणि हातगाडी यांसह इतर वाहनांचा समावेश आहे.

Manoj Jarange Patil : ‘हे दिवस आंदोलनाचे नाहीत’; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंची जरांगेंना विनंती

विशेष म्हणजे, आंदोलनाच्या ठिकाणी कोणतेही प्राणीही आणले जाणार नाहीत. पक्षी, घोडे, हत्ती, उंट, कोंबड्या यांसारखे प्राणी आंदोलनस्थळी आणले जाणार नसल्याचंही जरांगे पाटील यांच्या अर्जात स्पष्ट करण्यात आलं आहे. मराठा समाजाच्या न्याय्य आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन शांततेच्या मार्गाने, लोकशाही आणि घटनात्मक चौकटीत राहून करण्यात येणार असल्याचं अर्जात सांगण्यात आलं आहे.

आता पोलिसांनी यापूर्वी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर अटी मान्य करून तिसऱ्यांदा अर्ज करण्यात आल्याने मुंबई पोलिसांकडून यावेळी काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Manoj jarange mumbai protest third permission application azad maidan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
1

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

Manoj Jarange Patil : ‘मंत्र्यांनी जरांगेंचे पाय चेपून द्यावेत’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात, म्हणाले ‘सरकारमध्ये दम नाही’
2

Manoj Jarange Patil : ‘मंत्र्यांनी जरांगेंचे पाय चेपून द्यावेत’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात, म्हणाले ‘सरकारमध्ये दम नाही’

Manoj Jarange Patil : ‘हे दिवस आंदोलनाचे नाहीत’; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंची जरांगेंना विनंती
3

Manoj Jarange Patil : ‘हे दिवस आंदोलनाचे नाहीत’; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंची जरांगेंना विनंती

Manoj Jarange Mumbai Protest:  सलग दोनदा अर्ज फेटाळल्याने जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष; मराठा आंदोलनाची रणनीती बदलणार?
4

Manoj Jarange Mumbai Protest: सलग दोनदा अर्ज फेटाळल्याने जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष; मराठा आंदोलनाची रणनीती बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.