Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil : ‘बावनकुळे मराठ्यांची जात प्रमाणपत्रे रद्द करत आहेत’; मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप, निर्णायक आंदोलनाचा इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मराठ्यांची जात प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आरोप करत सरकारवर जोरदार टीका केली. तसेच २९ ऑगस्टचे आंदोलन हे शेवटचे आणि निर्णायक असेल, असा इशाराही दिला.

  • By विवेक
Updated On: Aug 07, 2026 | 09:52 PM
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Follow Us
Follow Us:

बावनकुळे यांच्यावर जात प्रमाणपत्रांबाबत गंभीर आरोप
मराठा मंत्र्यांनाही भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान
२९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत निर्णायक इशारा

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वातावरण तापले असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाची जात प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे बावनकुळे यांचा हस्तक्षेप असल्याचा दावा करत त्यांनी सरकार आणि मराठा मंत्र्यांवरही जोरदार टीका केली.

जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्रांच्या प्रश्नावर मराठा मंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. “बावनकुळे यांनी केलेली चूक आम्ही दुरुस्त करू,” असे त्यांनी जाहीरपणे सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच सरकार मराठा समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी असा दावाही केला की, जात प्रमाणपत्रांबाबतचे एक पत्र बावनकुळे यांच्या कार्यालयातूनच आपल्या हाती लागले आहे. संबंधित व्यक्तींची नावे आपण योग्य वेळी जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले. या आरोपांबाबत मात्र सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

‘हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार’; लक्ष्मण हाकेंच्या इशाऱ्यावर प्रसाद लाड यांचा जोरदार पलटवार

मनोज जरांगे यांनी पुढे आरोप केला की, मराठा समाजाच्या मागण्यांवर विलंब केला जात असून काही समन्वयक आणि अभ्यासकांच्या माध्यमातून आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र मराठा समाज या सर्व गोष्टींना बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजय शिरसाट यांच्यावरही टीका करत त्यांनी मराठा समाजाच्या विश्वासाला तडा गेल्याचा आरोप केला. मराठा समाजाच्या हिताच्या प्रश्नांवर मंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, २९ ऑगस्टला होणारे आंदोलन हे अंतिम आणि निर्णायक असेल, असा इशारा देत जरांगे यांनी यावेळी मोठी घोषणा केली. मराठा समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आणि जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे असून, आगामी काळात सरकार आणि मराठा आंदोलक यांच्यातील भूमिका काय राहते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

‘प्रसाद लाड दिसले तर कानशिलात लगावणार’; लक्ष्मण हाके यांचा इशारा, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नवा वाद

Web Title: Manoj jarange patil allegations against chandrashekhar bawankule maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Manoj Jarang patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा
1

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा

Manoj Jarange: बीडमध्ये सरकारचे नेते, तर पॅरिसमधून चर्चा! जरांगेंच्या उपोषणाला 20 व्या दिवशी अर्धविराम; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
2

Manoj Jarange: बीडमध्ये सरकारचे नेते, तर पॅरिसमधून चर्चा! जरांगेंच्या उपोषणाला 20 व्या दिवशी अर्धविराम; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

मोठी बातमी ! मनोज जरांगेंनी अखेर 20 दिवसानंतर उपोषण घेतले मागे; राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत
3

मोठी बातमी ! मनोज जरांगेंनी अखेर 20 दिवसानंतर उपोषण घेतले मागे; राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य
4

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.