Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: मुंबईत जाऊन मरेन, शरण येणार नाही! Manoj Janrange यांचा निर्धार

Manoj Jarange Patil, Maratha Reservation: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत जरांगे पाटील यांनी "मुंबईत जाऊन मरेन, पण सरकारसमोर गुडघे टेकणार नाही," असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 14, 2026 | 10:28 AM
Manoj Jarange Patil, Maratha Reservation, Antarwali Sarati Protest,

Manoj Jarange Patil, Maratha Reservation, Antarwali Sarati Protest,

Follow Us
Follow Us:
  • १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून निघून १९ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा मार्ग निश्चित
  • उपोषण सुरू असताना सहकाऱ्यांच्या होत असलेल्या चौकशा राजकीय दबावातून होत असल्याचा जरांगे पाटलांचा थेट आरोप
  • हैदराबाद व सातारा-कोल्हापूर गॅझेटनुसार कुणबी दाखले देण्याच्या मागणीवर सरकारला ८ दिवसांचा अल्टीमेटम
 

Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाच्या सोळाव्या दिवशी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप करतानाच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले. ‘मुंबईत जाऊन मरेन, पण सरकारसमोर गुडघे टेकणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रयाण करून १९ सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा त्यांनी पुन्हा केली.

चौकशांच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, आंदोलन सुरू असतानाच त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांची चौकशी का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महसूल विभागातील अधिकाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही अधिकारी काम करत असल्याचा दावा करत, हे सर्व दबावाखाली होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार

हैदराबाद गॅझेट, सातारा व कोल्हापूर गॅझेट, कुणबी सेट, कण्या प्रमाणपत्रांचा प्रश्न, तसेच एमपीएससी, ईडब्ल्यूएस आणि एसबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात.’ सरकारला आणखी आठ दिवसांची संधी आहे.
– मनोज जरांगे, मराठा नेते

चौकशांना घाबरणार नाही !

सरकारकडून आपल्याला आंदोलनापासून दूर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. चौकशांना शरण जाऊन मी घाबरणार नाही. आंदोलनाच्या ठिकाणी मरेन; पण सरकारसमोर गुडघे टेकणार नाही,’ असे त्यांनी सांगितले. जरांगे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही गंभीर आरोप केले. मुंबईतील आंदोलनादरम्यान आपल्याला गोळ्या घालण्याचा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही. या वक्तव्यावेळी ते भावुक झाले. ‘मला काही झाले तरी मराठ्यांनी एकत्र राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Hartalika 2026 : श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी

द्वेषभावनेतून परवानगी नाकारली

आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी नाकारण्यात आल्याच्या मुद्द्यावरही जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ‘द्वेषभावनेतून परवानगी नाकारण्यात आली आहे. आम्ही संविधानाच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत,’ असे ते म्हणाले. सरकारने पाणी व औषधोपचार बंद करण्यास भाग पाडल्यास आपण उपचारही स्वीकारणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

 

Web Title: Manoj jarange patil announces mumbai march sept 15 maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil : ‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,’ जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका
1

Manoj Jarange Patil : ‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,’ जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; ‘तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,’ परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील
2

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; ‘तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,’ परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील

Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
3

Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा
4

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.