
टोरंट प्रकल्पावरून सरकारला इशारा; ‘सह्याद्री उद्ध्वस्त करण्याचा घाट थांबवा’, मनोज जरांगे पाटील यांची मागणी
अहिल्याननगर येथून सकाळी कर्जत येथे पोहोचणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे कर्जत येथे जोरदार स्वागत झाले.छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिवादन केल्यानंतर पाली सायडोंगर येथे पोहचले.त्यावेळी कर्जत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी सोबत होते.यावेळी तोडलेले जंगल पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला कोणता पर्यावरण पुरक विकास करायचा आहे हे या ठिकाणाचे स्थानिक शेतकरी आणि आदिवासी लोकांशी येऊन बोलले पाहिजे, त्यांचे म्हणणे समजून घेतले पाहिजे. पंतप्रधान यांनी जनतेवर वार करण्याचे आणि जनतेला गृहीत धरून धक्के देण्याचे थांबवले पाहिजे.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, झाडे तोडायची नाहीत तर मुख्यमंत्र्यांनी हे ऐकले पाहिजे आणि जनतेला नको असेल तर प्रकल्प येथून अन्यत्र नेला पाहिजे असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.जंगल संपुष्टात आणण्याचा घाट घातला आहे हे रद्द केले पाहिजे आणि सह्याद्री उध्वस्त करण्याचा घातलेला घाट तेथून हलवला पाहिजे.नाहीतर मी येथील जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार असून संपूर्ण महाराष्ट्र येथे आणून उभा करण्याची गरज भासली तर ते देखील आम्ही करू असे जाहीर आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दिले.
जरांगे पाटील यांनी पुढे बोलताना सह्याद्री उध्वस्त करण्याचा ठेका घेणाऱ्यांना महाराष्ट्राचे माती मध्ये अशा लोकांना देशोधडीला लावण्याचे सामर्थ्य आहे आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र प्रेमी लोकांची परीक्षा पाहू नये असे आवाहन सत्ताधाऱ्यांना केले.मुख्यमंत्र्यांच्या पर्यावरण पुरक प्रकल्पाची खिल्ली उडवताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना आता वकिलाची सनद द्यायला लागेल असे सूचना करताना त्यांना तज्ज्ञ हुशार समजले जाते आणि त्यांना सह्याद्री उध्वस्त होत असताना दिसत नाही काय? अशी टीका केली.हे महाराष्ट्र जाणून असून पर्यावरण प्रेमी अशा सह्याद्री उध्वस्त करणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा मतपेटीतून दाखवून देईल असे इशारा देखील यावेळी बोलून दाखवला.
आम्ही राजकारण करीत नाही,तुम्ही म्हणजे सरकारने राजकारण करू नये आणि झाडे लावायची आणि जुनी तोडायची म्हणजे पर्यावरण नष्ट करण्याचे ठेका तुम्ही घेतला आहे काय? असा प्रश्न करीत तुम्हाला हा अधिकार दिला कोणी? असा प्रश्न देखील आणि तुम्हाला सह्याद्री माफ करणार नाही? असा इशारा पाटील यांनी दिला.स्वच्छ नैसर्गिक हवा येण्यासाठी 33 कोटी झाडे लावायची आहेत,मात्र झाडे तोडून प्रदूषण होत नाही काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
मुख्यमंत्र्यांच्या 33 कोटी झाडे लावण्याच्या वक्तव्याची खिल्ली उडवताना जरांगे पाटील यांनी 100- 200 वर्षाची झाडे तोडायची आणि म्हणायचे वृक्ष वल्ली आम्ही सोयरी वनचरे..यांचे सगेसोयरे नक्की कोण? टाटा, अदानी हे सगेसोयरे आहेत हे त्यांनी आधी जाहीर करावे असे आवाहन केले.तर झाडे लावा झाडे जगवा ही सरकारची जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रकार आहे असे सांगून सरकार ने हे थांबवायला हवे आणि जनतेच्या मतानुसार चालायला हवे असे आवाहन केले.
Karjat News : टोरेंटबाबत ग्रामस्थांचा आक्षेप; ग्रामपंचायती प्रकल्पाला गो बॅकचे निर्देश
Ans: मनोज जरांगे पाटील यांनी कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी येथील सायडोंगर परिसरात जाऊन तोडलेल्या जंगलाची पाहणी केली.
Ans: स्थानिक शेतकरी आणि आदिवासी नागरिकांचे म्हणणे सरकारने ऐकावे आणि त्यांना प्रकल्प नको असेल, तर तो अन्यत्र हलवण्याचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
Ans: स्थानिकांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गरज पडल्यास संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांना येथे आणू, असा इशाराही त्यांनी दिला.