Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील उपोषणाची जागा सोडून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करताना ते भावूक झाले. ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही’, अशी भूमिका त्यांनी मांडली.

  • By विवेक
Updated On: Sep 15, 2026 | 02:05 PM
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Follow Us
Follow Us:
  • अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने जरांगेंचा प्रवास सुरू
  • गाडीत बसताच मनोज जरांगे पाटील भावूक; अश्रू अनावर
  • मुंबईतील आंदोलनासाठी पोलिसांकडे तिसऱ्यांदा परवानगीचा अर्ज
 

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची धग वाढली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील उपोषणाची जागा सोडून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अंतरवाली सराटीतून निघताना जरांगे पाटील चांगलेच भावूक झाले. गाडीत बसताच त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट केली. “समाजाच्या लेकरांपेक्षा मला मोठे काय आहे. माझ्या समाजाचे लेकरं संकटात आहेत त्यांच्या कल्याणासाठी मी जातोय,” असं म्हणत त्यांनी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.

“सरकारला वाटतंय मी त्यांना शरण यावे; पण समाजाच्या लेकराला अर्धवट सोडून मी समाजाला धोका देऊ शकत नाही. मला ते मारून टाकणार आहेत म्हणून मी आझाद मैदानावर जात आहे. मी माझ्या समाजाला त्रास होऊ देणार नाही. मी लढून मरेल,” अशी आक्रमक भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली.

Rohit Pawar News: आदित्य ठाकरेंना क्लीनचीटच मिळेल; सीबीआयच्या FRIनंतर रोहित पवारांचा घणाघात!

आंदोलकांना शांतता राखण्याचं केलं आवाहन

मुंबईकडे रवाना होताना त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. “न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवायचा आणि तीच परवानगी समजायची,” असं सांगत त्यांनी समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन केलं. पक्षापेक्षा समाजाला महत्त्व द्या, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

“मी आझाद मैदानावर बसणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही,” असा निर्धार त्यांनी पुन्हा व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे अंतरवाली सराटीतून त्यांचा निघतानाचा क्षण भावनिक ठरला.

मुंबईतील आंदोलनासाठी तिसऱ्यांदा अर्ज

मुंबईतील आंदोलनासाठी जरांगे पाटील यांच्या वतीने मुंबई पोलिसांकडे पुन्हा अर्ज करण्यात आला आहे. यापूर्वी दोन वेळा परवानगी नाकारण्यात आल्यानंतर आता तिसऱ्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात ५० जणांना आंदोलनाची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

आंदोलनासाठी पोलिसांकडून घालण्यात येणाऱ्या नियम आणि अटींचं पालन केलं जाईल, असंही अर्जात नमूद करण्यात आलं आहे. १८ सप्टेंबर रोजी ठरवून दिलेल्या वेळेतच आंदोलन करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.

मात्र, सध्या गणेशोत्सवाचा काळ असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता परवानगी मिळण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Manoj jarange patil mumbai morcha azad maidan maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! दहिसर – भाईंदर लिंक रोडच्या कामाला गती; कुठपर्यंत आलंय काम?
1

मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! दहिसर – भाईंदर लिंक रोडच्या कामाला गती; कुठपर्यंत आलंय काम?

Manoj Jarange Mumbai Morcha: पोलिसांचा आंदोलनाला नकार; मनोज जरांगेंची तिरपी चाल, आता थेट हायकोर्टात जाण्याची तयारी!
2

Manoj Jarange Mumbai Morcha: पोलिसांचा आंदोलनाला नकार; मनोज जरांगेंची तिरपी चाल, आता थेट हायकोर्टात जाण्याची तयारी!

मुलांच्या सुरक्षेसाठी ‘खुली बात’! मिसिंग लिंक ट्रस्टचा मोठा पुढाकार; मुंबईतील १०० पालिकेच्या शाळांमध्ये AI…
3

मुलांच्या सुरक्षेसाठी ‘खुली बात’! मिसिंग लिंक ट्रस्टचा मोठा पुढाकार; मुंबईतील १०० पालिकेच्या शाळांमध्ये AI…

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी
4

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.