Maratha leader manoj jarange patil reaction on obc Subcommittee by state government
छत्रपती संभाजीनगर : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथून मोर्चा काढत मुंबईमध्ये उपोषण केले. जरांगे पाटील यांनी पाच दिवस आमरण उपोषण केले. यानंतर राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या पूर्ण झाल्या आहेत. याबाबत राज्य सरकारकडून जीआर काढण्यात आले. यानंतर आता जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी रुग्णालयातून आरक्षणाचा एल्गार दिला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका मांडली आहे. जरांगे पाटील यांनी नवीन शासन आदेशावर संशय घेण्यावर टीकास्त्र डागलं आहे. ते म्हणाले की, “आमच्यात कोणीही संभ्रम निर्माण केला तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि त्यांच्यावर माझा समाजही विश्वास ठेवणार नाही. उठलं की टीव्हीवर जाऊन बोलायचं. बाकी हे कशाला येत नाहीत ना बैठकांना येतात, ना बोलवल्यावर चर्चा करायला येत नाहीत,” असा टोला जरांगे पाटील यांनी टीका करणाऱ्या मराठा नेत्यांवर केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “कुरापती काढून संभ्रम निर्माण केला जातो आहे पण मराठा समाजात संभ्रम निर्माण होणार नाही. जे बोंबलत आहेत त्यांना बोंबलू द्या. मराठवाड्यातल्या सगळा मराठा मी आरक्षणात घालणार. काही दिवसांत मराठ्यांना हे दिसणार आहे. मराठ्यानी संभ्रम निर्माण करुन घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती आहे,” असे देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्यामुळे राज्य सरकारकडून ओबीसी उपसमिती करण्यात आली असून याबाबत देखील जीआर काढण्यात आला आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “गरीब मराठ्यांचं हित होणार असेल तर काहीही प्रश्न नाही. उपसमिती करा, कुणीही टोळ्या पाठवल्या काही फरक पडणार नाही. गरीब मराठा बांधवांना मी आरक्षण मिळवून देणार हे सगळ्यांना माहीत आहे. मराठ्यांना ओबीसीमध्ये आम्ही जाणारच. कोण काय म्हणतं त्याने काही फरक पडत नाही. मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देणारच. दलित मुस्लिमांसाठी उपसमिती नेमा, शेतकऱ्यांसाठी नेमा आणि मायक्रो ओबीसींसाठी उपसमिती नेमा अशीही मागणी मी करतो.” असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.