Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MahaVikas Aghadi Morcha : मतचोरी विरोधात मविआचा १ नोव्हेंबरला भव्य मोर्चा, लाखोंची होणार गर्दी, कसा असेल मार्ग?

निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा दुपारी ०१ वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होणार आहे.  

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 30, 2025 | 04:41 PM
मतचोरी विरोधात मविआचा १ नोव्हेंबरला भव्य मोर्चा, लाखोंची होणार गर्दी, कसा असेल मार्ग?

मतचोरी विरोधात मविआचा १ नोव्हेंबरला भव्य मोर्चा, लाखोंची होणार गर्दी, कसा असेल मार्ग?

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा
  • निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांचा मोर्चा
  • मतचोरीबाबत प्रमुख नेते पुढील आंदोलनाची दिशा ठरणार
मुंबई : निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतदार यादीतील घोळ आणि निवडणुकीतील गैरव्यवहारांविरोधात महाविकास आघाडी १ नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला मविआचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती असणार आहे. डाव्या पक्षांचे प्रमुख नेतेही मोर्चात सहभागी होणार असून, मतचोरीला बळी पडल्याचे वाटणारे सामान्य मतदारही या आंदोलनात सामील होतील, अशी माहिती मविआच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महसूलमंत्री बावनकुळे यांचा जागा हडप करणाऱ्या लॉबीला दणका; नूतनीकरणाचा ‘तो’ प्रस्ताव नामंजूर

मोर्चा दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होऊन मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचेल. हा मोर्चा दुपारी १ ते ४ या वेळेत संपवण्यात येईल, जेणेकरून मुंबईकरांना कमीत कमी त्रास होईल. उबाठा शिवसेना नेते अनिल परब यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, लोकांना सत्य कळावे आणि असत्य जनतेसमोर यावे यासाठी हा सत्याचा मोर्चा आहे. मविआचे सर्व पक्ष, मनसे आणि मतचोरीच्या विरोधात असलेले सर्वजण यात सहभागी होतील. मतदार यादीतील घोळ दूर करा आणि आमच्या आक्षेपांवर न्याय मिळावा, ही आमची मागणी आहे.

अनिल परब पुढे म्हणाले, आम्ही पोलिसांना भेटलो आहोत. त्यांच्या सूचना घेतल्या आहेत. मोर्चाचा रूट प्रसिद्ध केला आहे. उद्या क्यूआर कोड पाठवू, जेणेकरून लोकांची व्यवस्था होईल. मुंबईबाहेरून येणाऱ्या दोन व्यक्तींसाठी वाहन व्यवस्था राहील. प्रमुख नेते पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील. शरद पवार यांच्या उपस्थितीबाबतही परब यांनी दुजोरा दिला.

मतचोरीचा बारकाईने अभ्यास करत असल्याचे सांगत परब म्हणाले, चोक्कलिंगम यांनी सांगितलेल्या मुद्द्यांवरही अभ्यास सुरू आहे. हा मोर्चा फक्त राजकीय पक्षांचा नाही, तर ज्यांना आपले मत चोरीला गेले असा विश्वास आहे, अशा मतदारांसाठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका करत म्हणाले, चोर चोऱ्या करणारच. आमच्यावर गुन्हे दाखल करणार. रोहित पवार यांच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा दाखल केला. पण रोहित पवार घाबरणारे नाहीत. बिनधास्त नडत आहेत. हा गांधी-नेहरूंचा देश आहे. मविआच्या या मोर्चाने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मतदारांमध्ये असलेला रोष आणि आक्षेप निवारणाची मागणी यामुळे हे आंदोलन राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे ! 18 नोव्हेंबरपर्यंत e-KYC करा पूर्ण; अन्यथा…

Web Title: Mla anil parab gave information about how the morcha of mahavikas aaghadi and maharashtra news mns will be on the 1st november

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • Maharashtra Political
  • Mumbai

संबंधित बातम्या

शैक्षणिक धोरणात महत्त्वपूर्ण तरतुदी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले प्रतिपादन
1

शैक्षणिक धोरणात महत्त्वपूर्ण तरतुदी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले प्रतिपादन

घरांचे प्रश्न मार्गी लावणारे ‘हाउसिंग मॅन’ राज्याला लाभले, मनीषा कायंदेंकडून एकनाथ शिंदें यांचे अभिनंदन
2

घरांचे प्रश्न मार्गी लावणारे ‘हाउसिंग मॅन’ राज्याला लाभले, मनीषा कायंदेंकडून एकनाथ शिंदें यांचे अभिनंदन

इतिहासप्रेमींसाठी पर्वणी! मुंबईतील ‘या’ वस्तुसंग्रहालयात 5 हजार वर्षाचा इतिहास अनुभवायला मिळणार, आजच द्या भेट
3

इतिहासप्रेमींसाठी पर्वणी! मुंबईतील ‘या’ वस्तुसंग्रहालयात 5 हजार वर्षाचा इतिहास अनुभवायला मिळणार, आजच द्या भेट

“इंडि आघाडीसोबत जाऊन उबाठा जिहादी मानसिकतेचे झाले…”, संजय निरुपम यांची घणाघाती टीका
4

“इंडि आघाडीसोबत जाऊन उबाठा जिहादी मानसिकतेचे झाले…”, संजय निरुपम यांची घणाघाती टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.