ठाण्यात राजकीय समीकरणे बदलणार; महाविकास आघाडी–मनसे एकत्र येणार?
ठाणे: ठाण्यात महायुतीविरोधात महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नाद निवासस्थानी महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते. विशेष म्हणजे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः या बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घडामोडींमुळे ठाण्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. महायुतीविरुद्ध स्थानिक स्तरावर महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात युती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन पाण्यात पडला अन् बुडून मृत्यू झाला
जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये लिहीले आहे की, “मी, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण अशा आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत नागरिक समस्यांबाबत सुमारे तासभर चर्चा झाली.” ठाण्यातील वाहतूक कोंडी, डंपिंग, पाणीटंचाई तसेच रस्ते आणि मेट्रो प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीविरोधात हे पक्ष एकत्र येण्याचे हे पहिले पाऊल मानले जात असून, लवकरच मोर्चा काढण्याचीही चर्चा आहे.
ठाण्यातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) एकत्र येणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण महायुतीविरोधात या दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांची ठाण्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी खासदार राजन विचारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.
विशेष म्हणजे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या बैठकीचा व्हिडिओ स्वतः त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ठाण्यातील विविध समस्या आणि स्थानिक मुद्द्यांवर तासभर चर्चा झाल्याचे नमूद केले आहे. या घडामोडीनंतर मनसेची महाविकास आघाडीत एंट्री ठाण्यातूनच होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.