Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय दबावाला बळी पडू नका! पुण्यातील अनियमित पाणीपुरवठ्यावरुन चंद्रकांत पाटील आक्रमक

पुणे शहरामध्ये अनेकदा पाणीपुरवठ्यावरुन नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पुणे शहरातील गुरुवारी पाणीपुरवठा बंद असून या अनियमित पाणीपुरवठ्यावरुन आमदार चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 05, 2025 | 06:02 PM
'संजय राऊतांना राजकीय कावीळ, औषध मी देतो'; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निशाणा

'संजय राऊतांना राजकीय कावीळ, औषध मी देतो'; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निशाणा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे शहरामध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहरातील येत्या गुरुवारी देखील पाणीपुरवठा बंद आहे. कोथरूडमध्ये सुद्धा पाण्याचा मोठा प्रश्न आहे. कोथरूड मतदारसंघातील अनियमित पाणीपुरवठ्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळालं. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, नियमीत पाणीपुरवठा करावा अशा सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी, व्हॉलमन आणि नागरीक अशी संयुक्त बैठक कोथरूड मधील अंबर हॉल येथे झाली. या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, कार्यकारी अभियंता शंकर कोडूसकर कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे विजय नायकल, वारजे-कर्वेनगरचे दीपक राऊत, औंध-बाणेरचे गिरीश दापकेकर, भाजपा कोथरुड दक्षिण अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर यांच्या सह सर्व माजी नगरसेवक तथा पाणी पुरवठा विभागाचे सर्व‌ अधिकारी, कर्मचारी, व्हॉलमन उपस्थित होते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बैठकीच्या सुरुवातीला आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधील विविध भागातील पाणीपुरवठ्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित माजी नगरसेवकांनी अनियमित पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला. गेल्या काही वर्षांपासून महापालिका वेगवेगळ्या भागात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्याचे जाहीर करते. मात्र, त्यानंतर पुढील दोन-चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तसेच, बालेवाडी गावठाणमध्ये ठिकाणी दहा-दहा दिवस पाणीपुरवठा होत नाही. तर एसएनडीटी येथील समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाण्याची टाकी उभारली असली, तरी ते काम निकृष्ट झाले असून, टाकी सुरु होण्यापूर्वीच गळती लागल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच अनेक भागात पाणीपुरवठा करणारे कर्मचारी कामात कुचराई करत असल्याचे निदर्शनास आणले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्यावर आमदार पाटील यांनी संतप्त होत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. “पुणे महापालिकेच्या २४×७ योजनेअंतर्गत पहिली पाण्याची टाकी बाणेर बालेवाडी मध्ये कार्यान्वित झाली. त्यानंतर उर्वरित पुण्याला मार्गदर्शक ठरेल, असे याचे कार्यन्वयन सुरू झाले. पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. समान पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक घरात मिटर लावण्याचा निर्णय झाला असून, त्याचेही काम सुरू होईल.” असे मत आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, “दुसरीकडे पाणीपुरवठ्याबाबत अनेक तक्रारी वारंवार येत आहेत. सदर तक्रारमध्ये अनेक भागात राजकीय दबावामुळे अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ही बाब खपवून घेतली जाणार नाही. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. पाणी ही अत्यावश्यक बाब असल्याने नागरिकांना त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर पावले उचलावी लागतील,” अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: Mla chandrakant patil aggressive stance on irregular water supply in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • pune news

संबंधित बातम्या

दोन सख्ख्या भावांनी केली भावाची हत्या; न्यायालयाने आरोपी भावंडांना सुनावली ‘ही’ शिक्षा
1

दोन सख्ख्या भावांनी केली भावाची हत्या; न्यायालयाने आरोपी भावंडांना सुनावली ‘ही’ शिक्षा

पुणे विभागातील धरणे ओसंडून वाहिली; धरणांमध्ये 92 टक्के पाणीसाठा उपलब्ध
2

पुणे विभागातील धरणे ओसंडून वाहिली; धरणांमध्ये 92 टक्के पाणीसाठा उपलब्ध

Pune News: “तरुणांनी पुढाकार घेतलेले आंदोलन…”; ‘या’ समारंभात चंद्रकांत पाटलांचे महत्वाचे विधान
3

Pune News: “तरुणांनी पुढाकार घेतलेले आंदोलन…”; ‘या’ समारंभात चंद्रकांत पाटलांचे महत्वाचे विधान

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…;  150 कर्मचारी तैनात
4

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…; 150 कर्मचारी तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.