Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest: आमदार रोहित पाटील थेट दिल्लीतील ‘जंतर-मंतर’वर; NEET आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये मिसळून केंद्र सरकारविरोधात निदर्शने

तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर पोहोचून NEET आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 24, 2026 | 05:29 PM
आमदार रोहित पाटील थेट दिल्लीतील 'जंतर-मंतर'वर

आमदार रोहित पाटील थेट दिल्लीतील 'जंतर-मंतर'वर

Follow Us
Follow Us:
  • आमदार रोहित पाटील थेट दिल्लीतील ‘जंतर-मंतर’वर
  • NEET आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये मिसळून केंद्र सरकारविरोधात निदर्शने
  • वाचा सविस्तर
तासगाव: नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण, परीक्षांतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील (Rohit Patil) यांनी शुक्रवारी (दि. २४) प्रत्यक्ष भेट देत ठाम पाठिंबा जाहीर केला. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांमध्ये मिसळत त्यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या, सुरू असलेल्या आंदोलनाचा सविस्तर आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या आंदोलनाला महाराष्ट्रासह विविध राज्यांतून मोठा प्रतिसाद मिळत असताना आमदार रोहित पाटील यांनी थेट जंतर-मंतरवर पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तीन तासांहून अधिक काळ आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी, मागण्या आणि आंदोलनाची दिशा समजून घेतली. संघर्षाच्या काळात विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांनी नैतिक पाठिंब्याची ग्वाही दिली.

यावेळी विद्यार्थ्यांसमवेत उभे राहत आमदार रोहित पाटील यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका करत त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचा निषेध करत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत घोषणाबाजीमध्येही सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाणाऱ्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.

दिल्ली पोलिसांकडून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करत त्यांनी सांगितले की, शांततामय आणि लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे कोणत्याही लोकशाहीला शोभणारे नाही. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सरकारने त्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा. विद्यार्थ्यांच्या मागण्या केवळ त्यांच्या नाहीत, तर देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

‘ही तर सूड उगवल्यासारखी मारहाण’, विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून राज ठाकरेंचा संताप; पोलिसांना आदेश देणाऱ्यांवर उठवले प्रश्न

आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी दाखवलेला संयम, शिस्त आणि लढाऊ आत्मविश्वास याचेही त्यांनी कौतुक केले. कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू न देता विद्यार्थी अत्यंत शांततेत आणि संविधानिक मार्गाने आपला लढा लढत असल्याचे त्यांनी नमूद केले. हा संघर्ष केवळ एका परीक्षेचा नसून देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, हीच या आंदोलनाची मूळ भूमिका आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्या निर्धारात कोणतीही कमी झालेली नाही. देशाच्या भवितव्यासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत तातडीने निर्णय घ्यावा. न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील.”

यावेळी त्यांनी आंदोलनस्थळी सुरू असलेल्या घडामोडींचाही आढावा घेतला. दिल्लीतील आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिक जंतर-मंतरवर पोहोचून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. जागा मिळेल त्या मार्गाने दिल्ली गाठण्याची धडपड अनेकांकडून सुरू असून आंदोलनाची व्याप्ती क्षणाक्षणाला वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातून उमटणारा हा पाठिंबा विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला नवी ताकद देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दिल्लीतील आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहणारे आमदार रोहित पाटील हे राज्यातील मोजक्या जनप्रतिनिधींमध्ये ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मैदानात उतरून भूमिका घेणाऱ्या त्यांच्या या भेटीची राज्यभरात चर्चा सुरू असून, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनप्रतिनिधींनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, अशी भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

राहुल गांधींच्या घराबाहेर वातावरण पुन्हा तापलं; पोलिसांनी रोखली खासदारांची बस अन्… पहा व्हिडियो

Web Title: Mla rohit patil visits jantar mantar delhi supports neet protesting students demands resignation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • CJP Protest
  • neet paper leak
  • New Delhi
  • Rohit Patil
  • Tasgaon

संबंधित बातम्या

CJP Warning To Govt: शनिवार दुपारी ३:३० वाजेपर्यंत…; CJPचा सरकारलाचा शेवटचा ‘अल्टिमेटम’
1

CJP Warning To Govt: शनिवार दुपारी ३:३० वाजेपर्यंत…; CJPचा सरकारलाचा शेवटचा ‘अल्टिमेटम’

CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलनात क्रिकेटपटूंचीही ‘एन्ट्री’! शिखर-सचिनच्या पोस्ट व्हायरल
2

CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलनात क्रिकेटपटूंचीही ‘एन्ट्री’! शिखर-सचिनच्या पोस्ट व्हायरल

‘शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली’, पीडित तरुणाला समोर आणत राहुल गांधींचा संसदेतून गंभीर आरोप
3

‘शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली’, पीडित तरुणाला समोर आणत राहुल गांधींचा संसदेतून गंभीर आरोप

NEET Paper Leak: शिक्षण व्यवस्थेवर पेपरफुटीचा घाला! ‘डॉक्टर’ होण्याचं स्वप्न धुळीस, वैद्यकीय प्रवेशाऐवजी ‘या’ क्षेत्राला पसंती
4

NEET Paper Leak: शिक्षण व्यवस्थेवर पेपरफुटीचा घाला! ‘डॉक्टर’ होण्याचं स्वप्न धुळीस, वैद्यकीय प्रवेशाऐवजी ‘या’ क्षेत्राला पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.