MLA Rohit Pawar Reaction on ED Notice Maharashtra Political news
Rohit Pawar on ED Notice : मुंबई : राज्यामध्ये सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामध्ये विधान परिषद आणि विधान सभेमध्ये अनेक विषयांवर खडाजंगी सुरु झाली आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांना ईडीच्या नोटीस येण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना ईडीची नोटीस आलेली असताना आता रोहित पवार यांच्या देखील पाठीशी ईडीचा ससेमिरा वाढला आहे. यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ( MSCB) घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि काही इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यावर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईलच…!” असे स्पष्ट मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे… महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे!” असा आक्रमक पवित्रा आमदार रोहित पवार यांनी ईडीच्या नोटीसबाबत व्यक्त केले आहे.
कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. #ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या… pic.twitter.com/J7zdxNtWS2
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 12, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेमकं झालं काय?
ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीची ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली होती. जानेवारी २०२३ मध्ये, ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या जागेसह अनेक ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर कर्जत-जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना चौकशीसाठी ईडीच्या मुंबई कार्यालयात बोलावण्यात आले. मार्च २०२३ मध्ये, ईडीने बारामती अॅग्रोच्या ५०.२० कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या. यामध्ये औरंगाबादमधील कन्नड येथील १६१.३० एकर जमीन, एक साखर कारखाना, यंत्रसामग्री आणि इमारतींचा समावेश होता. तसेच, ईडीचा दावा आहे की या मालमत्ता मूळतः कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेड (कन्नड एसएसके) च्या होत्या. ज्या बारामती अॅग्रोने बनावट लिलाव प्रक्रियेद्वारे खरेदी केल्या होत्या. ईडीच्या मते, ही मालमत्ता गुन्ह्यातून मिळालेली रक्कम मानली जात आहे आणि मनी लाँडरिंग कायद्याचे उल्लंघन आहे.