Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death mystery: VSR कंपनीच्या मालकाचे राजकीय संबंध कोणाशी? रोहित पवारांनी फिरवली संशयाची सुई

पनीचा मालक व्ही. के. सिंह यांचे 'सीडीआर' (CDR) तपासून त्या दिवशीचे संभाषण समोर आणले पाहिजे. वैमानिक कपूर यांच्या वैद्यकीय अहवालात ड्रग्स, दारू किंवा विषाचे कोणतेही अंश आढळलेले नाहीत.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 09, 2026 | 04:07 PM
शक्ती कायदासाठी अधिवेशन बोलवा; रोहित पवारांची मागणी

शक्ती कायदासाठी अधिवेशन बोलवा; रोहित पवारांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • नियमानुसार ५,००० फूट दृश्यमानता हवी असताना, फक्त ३,००० फूट असताना उड्डाण का केले?
  • कॅप्टन कपूर यांच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अमली पदार्थ किंवा अल्कोहोल आढळले नाही, मग त्यांनी असा धोकादायक निर्णय कोणाच्या दबावाखाली घेतला?
  • व्ही. के. सिंह आणि वैमानिक यांच्यातील त्या दिवशीचे संभाषण समोर येण्यासाठी फोन रेकॉर्ड्सची तपासणी व्हावी.
Ajit Pawar Death mystery :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असतानाच, आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर गंभीर शंका उपस्थित केली आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा त्यांनी केला असून, या प्रकरणाचा आवाज संसदेत उठवण्यासाठी त्यांनी दिल्लीत बड्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

याच मोहिमेचा भाग म्हणून सोमवारी रोहित पवार यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी यादव यांच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे सुपूर्द केली आणि अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर संसदेत भूमिका मांडण्याची विनंती केली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांनी ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीच्या कार्यपद्धतीवर आणि विमान अपघातातील संशयास्पद बाबींवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली; राष्ट्रवादीचे नेते नाराज

आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक दावे केले आहेत. अपघाताच्या वेळी दृश्यमानता (Visibility) केवळ ३,००० फूट होती; सामान्यतः ५,००० फुटांपेक्षा कमी दृश्यमानता असताना वैमानिक उड्डाण टाळतात. मग दृश्यमानता कमी असतानाही व्ही. के. सिंह यांनी कॅप्टन कपूर यांना विमान उडवण्याचे निर्देश कसे दिले, असा संशय पवारांनी व्यक्त केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, “कंपनीचा मालक व्ही. के. सिंह यांचे ‘सीडीआर’ (CDR) तपासून त्या दिवशीचे संभाषण समोर आणले पाहिजे. वैमानिक कपूर यांच्या वैद्यकीय अहवालात ड्रग्स, दारू किंवा विषाचे कोणतेही अंश आढळलेले नाहीत. मग त्यांनी असा धोकादायक निर्णय का घेतला? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? तसेच व्ही. के. सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जाणे आवश्यक असल्याचेही त्यांनी ठामपणे मांडले.

प्रफुल्ल पटेलांना रोहित पवारांचे थेट सवाल

रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी आता प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक आणि त्यांचा मुलगा रोहित सिंह यांच्या राजस्थानमधील विवाह सोहळ्याला प्रफुल्ल पटेल उपस्थित होते का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

रोहित पवार म्हणाले की, “जर तुम्ही त्या लग्नाला उपस्थित होतात, तर तिथे इतर कोणते नेते आणि कोणत्या पक्षाचे लोक आले होते, याची माहिती महाराष्ट्रासमोर मांडावी. तुम्ही खरोखरच ‘अजितदादा प्रेमी’ आहात की स्वार्थी, हे आता स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडावी अशी महाराष्ट्राला अपेक्षा आहे.” रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे संबंधित विवाह सोहळ्यातील राजकीय नेत्यांच्या उपस्थितीबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, आता या प्रकरणात पुढे काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहित पवार यांची ट्विटर पोस्ट

Mr. प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं.. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या… उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा..!

 

Web Title: Who is the political connection of the owner of vsr airlines rohit pawar casts doubt on the matter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • praful patel
  • rohit pawar

संबंधित बातम्या

LPG गॅस दरवाढीवरून भाजपचा रोहित पवारांवर पलटवार, ‘आधी आपल्या पक्षाच्या अपयशाचा हिशोब द्या…’
1

LPG गॅस दरवाढीवरून भाजपचा रोहित पवारांवर पलटवार, ‘आधी आपल्या पक्षाच्या अपयशाचा हिशोब द्या…’

LPG Price hike: ‘सरकार प्रादेशिक पक्ष फोडण्यात व्यस्त त्यांना महागाई दिसत नाही,’ गॅस दरवाढीवरून रोहित पवार संतापले
2

LPG Price hike: ‘सरकार प्रादेशिक पक्ष फोडण्यात व्यस्त त्यांना महागाई दिसत नाही,’ गॅस दरवाढीवरून रोहित पवार संतापले

मोठी बातमी ! प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; भेटीदरम्यान केली ‘ही’ महत्त्वाची विनंती
3

मोठी बातमी ! प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; भेटीदरम्यान केली ‘ही’ महत्त्वाची विनंती

कर्जवसुली नको, कर्जमाफी हवी! शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार आक्रमक; १२ जूनपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन
4

कर्जवसुली नको, कर्जमाफी हवी! शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार आक्रमक; १२ जूनपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.