Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्यविजय भिसे यांनी गरीब गरजूनां मदत केली, ते समाज कार्यात अग्रेसर होते- वैभव नाईक

सत्यविजय भिसे यांचा आज २२ वा. स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

  • By नारायण परब
Updated On: Nov 22, 2024 | 11:40 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

सत्यविजय भिसे यांची २२ वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली.त्याचे दुःख अजूनही जनतेच्या मनात आहे. सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते. आम्ही त्यांच्यासोबत कार्यरत होतो. गरीब गरजू कुटुंबाला मदत करण्याचे काम त्यांनी केले होते. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. त्यांना अपेक्षित असलेले काम आपण सर्वांनी केले पाहिजे.भिसे कुटुंबीय आणि सत्यविजय भिसे मित्रमंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा स्मृतिदिन साजरा करीत असून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

शिवडाव येथे  सत्यविजय भिसे यांचा आज २२ वा. स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच वारकरी संप्रदायातील ५० वारकऱ्यांचा शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Sawantwadi Assembly Eelection: वाढीव मतदाराचा कौल कुणाला? कोण ठरणार आमदार, कोण उधळणार गुलाल आणि फटाके?

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, कै. सत्यविजय भिसे यांचा राजकारण आणि समाजकारणात असलेला नावलौकीक काही अपप्रवृत्तींना मान्य नसल्याने त्या अपप्रवृत्तीने कै. सत्यविजय भिसे यांची हत्या केली.त्या अपप्रवृत्तीला नियतीने धडा शिकवला. आज सत्यविजय भिसे जिवंत असते तर जिल्ह्याच्या राजकारणात अग्रस्थानी असले असते. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा भिसे कुटूंबिय आणि मित्रमंडळ जपत आहे. तरुणपिढीने देखील त्यांचा समाजसेवेचा वारसा आत्मसात करणे गरजेचे आहे. असे सांगितले.यावेळी माजी जि.प.सदस्य बाळा भिसे, शंकर पार्सेकर, दिनेश नाडकर्णी, रंजन चिके, शिवडाव सरपंच नितीश भिसे, उपसरपंच सायली तेली, विलास गावकर आदी उपस्थित होते.

बबन साळगावकरांनी भिसे प्रकरणात दिपक केसरकरांवर केले होते गंभीर आरोप

सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ शिवसेना नेते बबन साळगावकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर राजन तेली यांचे नाव सत्यविजय भिसे खून प्रकरणात गोवले असा आरोप हल्लीच केला होता.  ते म्हणाले होते की,  “दीपक केसरकर प्रत्येक निवडणुकीत अपप्रवृतीबद्दल बोलतात.  दीपक केसरकर यांनी अनेक वेळा पक्ष बदलले आहेत आणि प्रत्येकाला दगा दिला आहे. सत्यविजय भिसे खून प्रकरणात राजन तेलींना मंत्री दीपक केसरकर यांनी तत्कालिन गृहमंत्री छगन भुजबळ यांना फोन करून आरोपी केले होते. दीपक केसरकर हे वारंवार मंत्री भुजबळ यांना वारंवार या प्रकरणात राजन तेली यांचे गुतंवा असे सांगत होते. त्यामुळे तेली नाहक जेलमध्ये गेले. तेली कसे गुंतले याचा मी साक्षीदार आहे. प्रत्येकाला जेलमध्ये टाकेन असे म्हणणारे दीपक केसरकर एक दिवस स्वत: जेलमध्ये जातील.”

Web Title: Mla vaibhav naik said that satyavijay bhise helped the poor and needy he was a pioneer in social work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 11:40 PM

Topics:  

  • maharashtra
  • vaibhav naik

संबंधित बातम्या

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
1

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
2

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर
3

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय
4

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.