वाढीव मतदाराचा कौल कुणाला? कोण ठरणार आमदार, कोण उधळणार गुलाल आणि फटाके?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सावंतवाडी मतदारसंघासह कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदारसंघ हे लक्षवेधी ठरले आहेत. २६८ कणकवली विधानसभा मतदारसं घराची मतमोजणी एच पी सी ए एल कणकवली कॉलेज येथे होत असून २४ फेऱ्या आणि १४ टेबल वर होणार आहे. यासाठी २५० कर्मचारी निश्चित करण्यात आले आहेत. २६९ कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी तहसील कार्यालय कुडाळ येथे मतमोजणी होत असून २० फेऱ्यांमध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी २६० कर्मचारी निश्चित करण्यात आले आहेत. तसेच २७० सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी तहसील कार्यालय सावंतवाडी येथे होत असून २० फेऱ्यांमध्ये २० टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी २०० कर्मचारी निश्चित करण्यात आले आहेत, शांततापूर्ण वातावरणात मतमोजणी पार पडावी यासाठी प्रत्येकमतमोजणी ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने ज्यादा पोलीस कुमक आणि एस आर पी पोलीस तुकड्या आहे सज्ज ठेवण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील कुडाळ कणकवली आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी झाली. नव मतदार आणि मुंबई पुणे गोवा सह मोठ्या प्रमाणात आलेले चाकरमाने महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा मतदानाची टक्केवारी वाढविणारा ठरला असून मतदार राजाने उमेदवारांना सुखद धक्काच दिला आहे. जिल्ह्यातील ६ लाख ७८ हजार ९२८ मतदारापैकी चार लाख मतदाराने मतदानाचा हक्क बजावला ७१.११ टक्के मतदान झाले. मालवण कुडाळ मतदार संघात ७२ .२८ टक्के मतदान होऊन मतदारांनी सर्वाधिक मतदानाचा धुरळा उडवला असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात झालेल्या चौरंगी लढतीत ७१.५५% मतदान झाले तर कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघात ६९. ५५% विक्रमी मतदान झाले. या वाढीव मतदानाचा टक्का कुणाच्या फायद्याचा ठरणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निकालासाठी काही तास; मात्र ‘या’ बहुचर्चित मतदारसंघात फेरमतदानाची मागणी
कणकवली विधानसभा मतदारसंघात झालेली दुरंगी लढत ही उबाटा शिवसेनेचे संदेश पारकर यांना अपक्ष उमेदवारांचा बसणारा फटका आणि गणेशोत्सव होळी प्रमाणे मतदानासाठी मोठ्या प्रमाणात आलेले चाकरमाने मतदार यामुळे ही निवडणूक एकतर्फी रेकॉर्ड ब्रेक करणारी ठरेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नितेश राणे यांचे पारडे जड करणारी ठरेल अशी चर्चा रंगू लागली आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक आणि निलेश राणे याच्यात उत्स्फूर्तदुरंगी लढतीत सर्वाधिक ७२ .११ टक्के मतदान झाले. ही विजयाची नांदी कोणाच्या बाजूने झुकते याची चर्चा असताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ मालवण मतदार संघात घेतलेली मेहनत याचा फायदा निलेश राणे यांना होऊन ते विजयाची नांदी ठरू शकतात, असे बोलले जात असून वैभव नाईक यांनाही ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात मानणारा मतदार आहे.
भूतनिहाय दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न आणि मेहनत यात शिंदे शिवसेनाआणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली संघटित मेहनत निलेश राणे यांच्या पाढ्यात १ ७ ते १८ हजाराचे मताधिक्य देणारी ठरेल अशी शक्यता आहे. तसेच सावंतवाडी मतदारसंघात होणारी चौरंगी लढत त्या चौरंगी खुर्चीवर कोण बसणार याचीच उत्सुकता मतदारांच्या मनामनात रंगू लागले आहे. दीपक केसरकर आणि विशाल परब यांच्या खरी काटे की टक्करलढत झाली जर विशाल परब यांनी २० हजारच्या पेक्षा जास्त मते घेतली, तर दीपक केसरकर बाजी मारून जातीलआणि विजयी होतील त्यांचा मागील अनुभव दांडगा आहे. त्यात भाजपाची ताकद कुणाला मिळते? ती जर विशाल परब यांना मिळाली तर विशाल परब या विजयाच्या चौरंगी खुर्चीवर बसतील किंवा उभाटा शिवसेनेच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांच्यामार्फत एकजुटीने प्रयत्न केल्यास राजन तेली यांच्या माध्यमातून छुपी मतदाराची टक्केवारी वाढवून, दीपक केसरकर आणि विशाल परब यांच्या भांडणात राजन तेली यांना फायदा होऊ शकेल की काय ? अशी चर्चा असून वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होतो दीपक केसरकर विशाल परब कोणाला किती मते पडणार कोण होणार सावंतवाडीचा आमदार या चौरंगी खुर्चीचा मान कुणाला याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.
बारामतीत पवार विरुद्ध पवार रंगणार सामना; मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज