Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharmendra passed Away : “हे धर्मेन्द्रजींच्या अफाट क्षमतेचं दर्शन..; राज ठाकरेंची खास भावनिक पोस्ट

Raj Thackeray on Dharmendra : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज (दि.24) निधन झाले आहे. यामुळे मनसे नेते राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 24, 2025 | 04:56 PM
MNS leader Raj Thackeray's post pays emotional tribute to actor Dharmendra Deol

MNS leader Raj Thackeray's post pays emotional tribute to actor Dharmendra Deol

Follow Us
Close
Follow Us:

Raj Thackeray on Dharmendra : मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज (दि.24) निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १० नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांची प्रकृती लक्षणीयरीत्या बिघडली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे समजले होते. त्यानंतर, सलमान खानपासून ते शाहरुख खान आणि गोविंदापर्यंतच्या सेलिब्रिटींनी ज्येष्ठ अभिनेत्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात हजेरी लावली. यानंतर आता बॉलीवुड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाल्याने सर्वांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली.

बॉलीवुड अभिनेते धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांनी देखील भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत. मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर अभिनेते धर्मेद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी पोस्ट लिहिली आहे. राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात ‘सुपरस्टार’ म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू दिलं नाही. मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं, असे राज ठाकरे यांनी लिहिले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे लिहिले आहे की, १९६० च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीराने अतिशय सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्वाचा एक तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशकं त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर गारुड केलं.”

ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात ‘सुपरस्टार’ म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू… pic.twitter.com/aB3ff0nVHs — Raj Thackeray (@RajThackeray) November 24, 2025

अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी घेतला अखेरचा श्वास, वाचा सविस्तर

करिअरच्या सुरुवातीलाच बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं भाग्य कितींच्या वाट्याला येतं? पुढे ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद, रमेश सिप्पी, राज खोसला, मनमोहन देसाई यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांना धर्मेंद्र आपला नायक असावा असं वाटणं यातच धर्मेन्द्रजींच्यातल्या अफाट क्षमतेचं दर्शन होतं. आणि सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हिरो वाटत राहिला. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title: Mns leader raj thackerays post pays emotional tribute to actor dharmendra deol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • dharmendra
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Dharmendra Car Collection : धर्मेंद यांच्या ताफ्यात कोण- कोणत्या गाड्यांचे कलेक्शन? पहिली कार फक्त इतक्या पैशात केली खरेदी
1

Dharmendra Car Collection : धर्मेंद यांच्या ताफ्यात कोण- कोणत्या गाड्यांचे कलेक्शन? पहिली कार फक्त इतक्या पैशात केली खरेदी

dharmendra passed Away : अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; CM फडणवीस यांच्यासह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
2

dharmendra passed Away : अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; CM फडणवीस यांच्यासह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Dharmendra Passed Away: “धर्मेंद्रजींच्या निधनाने एका युगाचा…”; PM नरेंद्र मोदींंनी वाहिली श्रद्धांजली
3

Dharmendra Passed Away: “धर्मेंद्रजींच्या निधनाने एका युगाचा…”; PM नरेंद्र मोदींंनी वाहिली श्रद्धांजली

Dharmendra Famous Dialogues: ‘कुत्ते, कमिने, मैं तेरा…’, आजही अंगावर शहारे आणतात धर्मेंद्र यांचे ‘हे’ डायलॉग
4

Dharmendra Famous Dialogues: ‘कुत्ते, कमिने, मैं तेरा…’, आजही अंगावर शहारे आणतात धर्मेंद्र यांचे ‘हे’ डायलॉग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.