Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Jayanti 2025 : राज ठाकरेंची शिवजयंतीनिमित्त खास पोस्ट; छत्रपती शिवरायांकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा

राज्यभरामध्ये तिथीप्रमाणे शिवजयंतीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवजयंती 2025 निमित्त मनसे राज ठाकरे यांनी खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 17, 2025 | 11:06 AM
MNS Raj Thackeray's special social media post on the occasion of Shiv Jayanti 2025

MNS Raj Thackeray's special social media post on the occasion of Shiv Jayanti 2025

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जात आहे. विविध ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले जात असून पुष्पाची उधळण केली जात आहे. धाडसी खेळ आणि पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील शिवजयंतीनिमित्त खास पोस्ट केली आहे. राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये गाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून सदैव मिळत राहू दे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण ३६५ दिवस साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून ३६५ दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केलं पाहिजे.

वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पहायचं, त्याची ध्येयधोरण आखायची आणि स्वतःच आर्थिक चलन आणायचं , फार्सी भाषा नाकारून स्वतःचा मराठी शब्दकोश निर्माण करायचा , पुढे एक एक किल्ले जिंकायचे आणि लहान वयातच पीछेहाट पण सहन करायची आणि हे करताना आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांचे मनोधैर्य कुठेही खचू द्यायचे नाही याला एक अद्वितीय प्रतिभाच असली पाहिजे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराजांच्या आयुष्यात मधला एक कालखंड असा एक जाणवतो की त्यात फार काही घडत नाही असं वरवर बघणाऱ्याला वाटेल, पण त्याच काळात महाराजांनी खूप पुढची आखणी केली. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे तसं, जेंव्हा बाहेर वादळ असतं तेंव्हा शांत आत बसून शक्ती साठवून ठेवावी आणि जेंव्हा बाहेर शांतता असते तेंव्हा आपलं वादळ निर्माण करावं. महाराजांच्या आयुष्याकडे बघितलं की नेहमी कुतूहल वाटतं की ही समज इतक्या लहान वयात कुठून आली असेल.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आजकाल छोट्या छोट्या पीछेहाटीने किंवा नकाराने नैराश्य येण्याच्या काळात, प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पारायण केलं तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा महाराजांनी किती शांतपणे स्वराज्य उभं केलं हे जाणवेल, आणि मग असली किरकोळ नैराश्य कधीच येणार नाहीत.

आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण ३६५ दिवस साजरी करायची… pic.twitter.com/DqjnlFJvVh

— Raj Thackeray (@RajThackeray) March 17, 2025

माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे, त्यामुळे कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शून पण जात नाही आणि झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी विचारांती बोलतो, आणि हे करताना महाराष्ट्र घडवण्याचं माझं जे ध्येय आहे त्यावरची अगाढ श्रद्धा टिकून राहते हे सगळं शिवचरित्राने मला दिल आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून सदैव मिळत राहू दे हीच इच्छा. छत्रपती शिवाजी महाराज या अलौकिक नायकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानाचा मुजरा !

 

 

Web Title: Mns raj thackerays special social media post on the occasion of shiv jayanti 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • MNS
  • Raj Thackeary
  • shivjayanti

संबंधित बातम्या

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
1

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

“स्वातंत्र्यदिनीच कशावर तरी बंदी हाच मोठा विरोधाभास…; पालिकेच्या निर्णयावर राज ठाकरे भडकले
2

“स्वातंत्र्यदिनीच कशावर तरी बंदी हाच मोठा विरोधाभास…; पालिकेच्या निर्णयावर राज ठाकरे भडकले

MNS on Meat Banned : 15 ऑगस्टला KDMC हद्दीत मटन, चिकन, मच्छी विक्रीला बंदी…; मनसेची भूमिका काय?
3

MNS on Meat Banned : 15 ऑगस्टला KDMC हद्दीत मटन, चिकन, मच्छी विक्रीला बंदी…; मनसेची भूमिका काय?

Raju Patil: “१५ ॲागस्टला मांसाहारी हॅाटेल्स बंद ठेवणार का?” राजू पाटील यांचा संतप्त सवाल
4

Raju Patil: “१५ ॲागस्टला मांसाहारी हॅाटेल्स बंद ठेवणार का?” राजू पाटील यांचा संतप्त सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.