mns sandeep deshpande meets shinde group uday samant political news
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीमध्ये मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचूक टायमिंग साधलं आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असून त्यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे.
मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. ठाकरे गटाने राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे बोलले जात होते. याबाबत खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी सूचक असे विधान देखील केले होते. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. या राजकीय युतीमध्ये मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या बाजूने वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्यापूर्वी भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुमारे एक तास चर्चा झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्य मुंबईतील वांद्रे परिसरातील ताज लँड अँड हॉटेलमध्ये भेट झाली आहे. यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यता आता मावळायला लागल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी देखील महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. मनसे पक्षाचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. संदीप देशपांडे व उदय सामंत यांच्यामध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली आहे. यावेळी मनसे नेते अमेय खोपकर हे देखील उपस्थित होते. त्यामुळे पक्षाचे प्रमुख नेते असलेल्या राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस तर संदीप देशपांडे यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते. उद्धव ठाकरे यांनी मागची भांडणे आणि विचारभेद विसरुन मनसे पक्षासोबत युती करण्याबाबत सूचक वक्तव्य केली होती. मात्र मनसे पक्ष जे जोरदार तयारी लागला आहे. मनसे प्रवक्ते आणि नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या भेटी घेतल्यामुळे ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे हे नेहमी आक्रमक पद्धतीने भाषणांमधून भूमिका घेताना दिसून येतात. मात्र भाषणाला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करण्यामध्ये मनसे पक्षाला अद्याप यश आलेले नाही. राज ठाकरे हे भाजपवर भाषणांमधून जोरदार हल्लाबोल करताना देखील दिसतात. तर दुसरीकडे बिनशर्त पाठिंबा देताना देखील दिसून येतात. यापूर्वी झालेल्या 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार भूमिका घेतली होती. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केल्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका नक्की कोणती याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.