Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभेसाठी मनसे ॲक्शन मोडवर!अमित ठाकरे ‘या’ मतदारसंघातून देणार लढत?

विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष हा पूर्ण ताकदीने सामोरे जाणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. यानंतर आता उमेदवारांची चाचपणी सुरु असून अमित ठाकरे यांचा मतदारसंघ ठरला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 18, 2024 | 02:20 PM
Amit Thackeray will contest the assembly from Mahim constituency

Amit Thackeray will contest the assembly from Mahim constituency

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल हाती येणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु आहे. जागावाटप, बैठका आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीची तयारी सुरु आहे. तर तिसरी आघाडी देखील राज्यामध्ये तयारी झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील लढण्याचा इशारा दिला आहे. तर मनसे देखील या वर्षी सत्तेमध्ये सामील असेल असे सूचक विधान राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये इतर राजकीय पक्षापेक्षा सर्वात जास्त जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. तसेच यावेळी आम्ही सत्तेमध्ये सामील होणार असल्याचा विश्वास देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राज्यभरातील मनसे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक यांनी तयारी सुरु केली आहे. या संदर्भात अनेक नेते देखील राज ठाकरे व अमित ठाकरे यांची भेट घेत आहेत. दरम्यान, अमित ठाकरे यांच्या मतदारसंघाची चर्चा रंगली असून त्यांचा मतदारसंघ देखील समोर आला आहे.

हे देखील वाचा : गुवाहटीच्या अर्ध्या वाटेत सोडली होती शिंदेंची साथ; ठाकरे गटाकडून थेट ‘या’ नेत्याला धाराशिवची उमेदवारी

अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वीच लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत ही इच्छा मांडली होती. त्यानुसार, राज ठाकरे स्वतः अमित ठाकरे यांच्या मतदारसंघाची चाचपणी करत होते. यापूर्वी अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड करण्यात आली होती. मात्र आता त्यांचा मतदारसंघ बदलणार असल्याचे समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ,अमित ठाकरे हे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे माहिममधील मनसे नेते पदाधिकारी कामाला लागले असून जोरदार तयारी करत आहेत.

Web Title: Mns will contest the assembly with full strength and amit thackerays constituency has been decided

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 12:28 PM

Topics:  

  • amit thackeray
  • raj thackeray
  • Vidhansabha Election 2024

संबंधित बातम्या

Shivsena UBT-MNS : 50-50 की 60-40? शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, मुंबईत कोण किती जागा लढणार ?
1

Shivsena UBT-MNS : 50-50 की 60-40? शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, मुंबईत कोण किती जागा लढणार ?

Raj Thackeray in Shivaji Park : राज ठाकरेंची आता सटकली? मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकताच घटनास्थळी दाखल
2

Raj Thackeray in Shivaji Park : राज ठाकरेंची आता सटकली? मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकताच घटनास्थळी दाखल

Raj Thackeray cartoon Art : उठा चला…आपण जिंकलो? राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून भारत-पाक सामन्यावर टीकास्त्र
3

Raj Thackeray cartoon Art : उठा चला…आपण जिंकलो? राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून भारत-पाक सामन्यावर टीकास्त्र

Prakash Mahajan Resign : मनसेला मोठा धक्का! “…तरी निवडणुकीचे तिकिट मिळत नव्हते”, प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
4

Prakash Mahajan Resign : मनसेला मोठा धक्का! “…तरी निवडणुकीचे तिकिट मिळत नव्हते”, प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.