Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray: ‘पुढच्या वर्षी पुन्हा एकदा…’, राज ठाकरेंनी ट्विट करत केली मोठी घोषणा; यंदा दीपोत्सव रद्द, नेमकं कारण काय?

Raj Thackeray: महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे सावट असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाचा शिवाजी पार्कातील दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. एक्सवर व्हिडीओ शेअर करत त्यांनी याबाबत घोषणा केली. दुष्काळग्रस्त बांधवांच्या परिस्थितीचा विचार करून दिवाळीचा उत्साह मर्यादित ठेवावा, रोषणाई आणि फटाक्यांवर आवर घालावा....

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 04, 2026 | 12:27 PM
'पुढच्या वर्षी पुन्हा एकदा...', राज ठाकरेंनी ट्विट करत केली मोठी घोषणा; यंदा दीपोत्सव रद्द, नेमकं कारण काय?

'पुढच्या वर्षी पुन्हा एकदा...', राज ठाकरेंनी ट्विट करत केली मोठी घोषणा; यंदा दीपोत्सव रद्द, नेमकं कारण काय?

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा मोठा निर्णय
  • यंदा शिवाजी पार्कात मनसेचा दीपोत्सव होणार नाही!
  • दीपोत्सव रद्द, फटाके फोडण्याबाबतही आवाहन
Raj Thackeray: राज्यात उद्यापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत असून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वत्र दिवाळीचा उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील ग्रामीण भाग दुष्काळाच्या संकटाचा सामना करत आहे. अनेक भागांमध्ये पाणीटंचाई आणि शेतीच्या प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदा मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसेकडून आयोजित केला जाणारा पारंपरिक दीपोत्सव साजरा केला जाणार नाही, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. (Raj Thackeray)

राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर करून हा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रातील आपले बांधव दुष्काळामुळे होरपळत असताना आपण मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करणे मनाला पटत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कातील दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वाची लढाई; निम्मे आमदार सुनेत्रा पवारांच्या बाजूने

‘त्यांना काय वाटेल?’ राज ठाकरेंचा भावनिक सवाल

राज ठाकरे यांनी आपल्या व्हिडीओमध्ये राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले. महाराष्ट्र सध्या एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. राज्यातील ग्रामीण भागात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून दुष्काळाचे संकट अधिक गडद होत आहे. अशा परिस्थितीत आपण शहरांमध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली, तर दुष्काळग्रस्त भागातील आपल्या बांधवांना आणि भगिनींना काय वाटेल? त्यांच्या लहान मुलांच्या मनावर काय परिणाम होईल? याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

फटाके आणि रोषणाईबाबतही नागरिकांना आवाहन

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळाबाबतच्या विधानाचाही उल्लेख केला. यंदाचा दुष्काळ 1972 पेक्षाही भयानक असू शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. अशा गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

नम्र आवाहन. https://t.co/KDkGAVF0ZC — Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2026

मात्र, त्यांनी नागरिकांना दिवाळी साजरी करू नका किंवा काळी दिवाळी पाळा, असे सांगितलेले नाही. उलट कंदील लावा, फराळ वाटा आणि सणाचा आनंद घ्या; मात्र रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीवर आवर घाला, अशी विनंती त्यांनी केली आहे. आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि महाराष्ट्रावर आपले प्रेम आहे. राज्यातील आपले बांधव संकटात असताना त्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

पुढील वर्षी पुन्हा जल्लोषात दीपोत्सव साजरा करण्याची आशा

मनसेकडून दरवर्षी शिवाजी पार्क येथे भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. या निमित्ताने संपूर्ण परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते. फटाक्यांची आतषबाजी आणि दिव्यांच्या सजावटीचा आनंद घेण्यासाठी मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध भागांतून नागरिक येतात. मात्र, यंदा दुष्काळग्रस्त बांधवांच्या परिस्थितीचा विचार करून हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी राज्यातील परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा एकदा सर्वजण मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करू, अशी आशा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या आवाहनाची दखल घेतली जात आहे.

Satara News : पाच हजारांच्या पहिल्या हप्त्यासाठी स्वाभिमानीने महामार्ग रोखला! नागठाण्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

💡

Frequently Asked Questions

  • Que: राज ठाकरे यांनी यंदा कोणता मोठा निर्णय घेतला आहे?

    Ans: महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी यंदा शिवाजी पार्कात मनसेचा दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Que: मनसेचा दीपोत्सव कुठे आयोजित केला जातो?

    Ans: मनसेकडून दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाते.

  • Que: राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला काय आवाहन केले आहे?

    Ans: दुष्काळग्रस्त नागरिकांच्या परिस्थितीचा विचार करून दिवाळीचा उत्साह मर्यादित ठेवावा, फटाके फोडताना आवर घालावा आणि अनावश्यक रोषणाई टाळावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Raj thackeray cancels mns diwali deepotsav shivaji park drought maharashtra sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • Maharashtra Political
  • MNS
  • raj thackeray
  • Shivaji Park

संबंधित बातम्या

Shivaji Park Gymkhana देणार महिला क्रिकेटला नवी दिशा; १५ वर्षांवरील खेळाडूंसाठी निवड चाचणी
1

Shivaji Park Gymkhana देणार महिला क्रिकेटला नवी दिशा; १५ वर्षांवरील खेळाडूंसाठी निवड चाचणी

Shivaji Park : ‘जब दीप जले आना’च्या सुरांनी रंगली दिवाळी संध्या; राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक पत्कींचा सन्मान
2

Shivaji Park : ‘जब दीप जले आना’च्या सुरांनी रंगली दिवाळी संध्या; राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक पत्कींचा सन्मान

Raj Thackeray on Sanjay Raut : ‘बाळासाहेबांनी मुलाखतीतच शिव्या दिल्या, तरी राऊतांनी छापल्या,’ राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा!
3

Raj Thackeray on Sanjay Raut : ‘बाळासाहेबांनी मुलाखतीतच शिव्या दिल्या, तरी राऊतांनी छापल्या,’ राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा!

Sanjay Raut : ‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’; संजय राऊतांची फटकेबाजी, ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन
4

Sanjay Raut : ‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’; संजय राऊतांची फटकेबाजी, ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.