Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prashant Padole Accident : काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा भीषण अपघात; एअरबॅग उघडल्या नाहीच अन्..

Prashant Padole Accident News : नागपूर एअरपोर्टच्या दिशेने प्रवास करताना खासदार डॉ. प्रशांत पडोले यांच्या चारचाकी गाडीचा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये खासदार डॉ. प्रशांत पडोले हे किरकोळ जखमी झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 30, 2026 | 11:01 AM
MP Dr. Prashant Padole car Accident on Nagpur Airport Road bhandara News

MP Dr. Prashant Padole car Accident on Nagpur Airport Road bhandara News

Follow Us
Close
Follow Us:
  • काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळेंचा अपघात
  • नागपूर एअरपोर्टवर जाताना अपघात
  • रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Prashant Padole Accident News : भंडारा : भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. नागपूर एअरपोर्टच्या दिशेने प्रवास करताना खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या चारचाकी गाडीचा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे किरकोळ जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा आणि सतत होत असलेल्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Political News)

 

काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे आपल्या कारने नागपूर एअरपोर्टच्या दिशेने चालले असताना हा अपघात झाला. अपघातात काँग्रेस खासदारांसह त्यांचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. सध्या दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरु आहे. त्यात सहभागी होण्यासाठी डॉ. प्रशांत पडोळे चालले होते. यामुळे नागपूर एअरपोर्टच्या दिशेने ते चारचाकीने चालले होते. मात्र त्यांच्या गाडीचा अपघात झाला. आश्चर्याची बाब म्हणजे यापूर्वी देखील 2025 मध्ये खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यावेळी सुद्धा सुदैवाने त्यांचे प्राण वाचले होते.

हे देखील वाचा : Rupali Chakankar Arrest Demand: रुपाली चाकणकरांना अटक होणार?

आज सोमवारी (30 मार्च) सकाळी आपल्या कारने नागपूर एअरपोर्टच्या दिशेने निघाले होते. एअरपोर्ट मार्गावर असताना एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन या अपघाताची माहिती दिली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केलं. “खासदार सुरक्षित नाही, तिथे जनतेचं काय होणार?. आज दिल्लीला जायचं होतं. सकाळी भंडाऱ्यावरुन खासगी कार घेऊन नागपूर एअरपोर्टच्या दिशेने निघालो होतो. नागपूर जवळ असताना ट्रकने जोरदार धडक दिली. मला कुठे लागलं नाही. पण कारचं नुकसान झालं” असे त्यांनी एक्सपोस्टमध्ये लिहिले आहे.

सांसद नहीं सुरक्षित.
जनता का क्या होगा?
आज दिल्ली के लिए निकलना था, सुबह भंडारा से निजी कार से नागपूर एयरपोर्ट पर जाना था.
नागपूर के करीब ट्रक वाले ने जोरदार टक्कर दी. कार क्षतिग्रस्त हुई पर मुझे कही लगा नहीं लेकिन कार का नुकसान हुआ.
मा @nitin_gadkari कार कंपनी को सख्त pic.twitter.com/BXb0YkLMDL
— Dr Prashant Padole (@_Prashantpadole) March 30, 2026

हे देखील वाचा : “राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?

अपघातानंतर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कारमधील एअर बॅग उघडली नाही, असा धक्कादायक दावा देखील त्यांनी केला आहे. याबाबत देखील त्यांनी प्रश्चचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी एक्सवर नुकसानग्रस्त कारचा फोटो शेअर केला. अपघातानंतर एअरबॅग उघडली पाहिजे होती. पण माझ्यासोबत असं झालं नाही असं त्यांनी लिहिलंय. किरकोळ दुखापत झाल्यानंतर खासदार प्रशांत पडोळे एका दुचाकीची लिफ्ट घेऊन नागपूरला पोहोचले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर नागपूर विमान तळावर पोहोचले आणि दिल्लीला रवाना झाले. विशेष म्हणजे याच मार्गावर यापूर्वीही दोनदा अपघात झाल्याने हा तिसरा प्रसंग ठरला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Mp dr prashant padole car accident on nagpur airport road bhandara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Accident News
  • Bhandara
  • Congress

संबंधित बातम्या

Sonia Gandhi Health : मोठी बातमी! सोनिया गांधी मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
1

Sonia Gandhi Health : मोठी बातमी! सोनिया गांधी मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

भाजप सरकारला परीक्षाही घेता नाहीत; NEET पेपरफुटी प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
2

भाजप सरकारला परीक्षाही घेता नाहीत; NEET पेपरफुटी प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!
3

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल
4

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.