
MP Sanjay Raut alleges DCM Eknath Shinde brought money from black suitcase Malvan
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरने मालवणमध्ये आले. यावेळी त्यांनी उपस्थितीत लोकांनी केलेले स्वागत स्वीकारले. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांच्या दोन काळ्या बॅगा पुढे नेल्या. एकनाथ शिंदे यांनी प्रचारानंतर या बॅगांमध्ये काय आणले यावरुन आता राज्याचे राजकारण तापले आहे. दोन मोठ्या या ट्रॅव्हल बॅगमधून एकनाथ शिंदे यांनी पैसे आणले असल्याचा आरोप विरोधकांनी सुरु केला आहे. यापूर्वी देखील झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेंनी पैशांची बॅग आणली असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावेळी देखील संजय राऊत यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागले.
हे देखील वाचा : भाजपवर टीका करुन शहाजी बापू पाटील फसले? चौकशीचा ससेमिरा अन् विरोधकांचे टीकास्त्र
खासदार संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकनाथ शिंदे यांची व्हिडिओ शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी शिंदेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी लिहिले आहे की, शिंदे मालवणात आले येताना बॅगेतून काय आणले?मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर! या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या. लोकशाही ची ऐशी की तैशी?जय महाराष्ट्र!, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
शिंदे मालवणात आले
येताना बॅगेतून काय आणले?
मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर!
या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या
लोकशाही ची ऐशी की तैशी?
जय महाराष्ट्र!
@ECISVEEP
@Dev_Fadnavis pic.twitter.com/TKXOXrv7FS — Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2025
हे देखील वाचा : “शिंदेंनीं मालवणला दोन बॅग मधून काय आणले? पैसे होते?” अंजली दमानियांचा सवाल
त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी देखील एकनाथ शिंदे यांची व्हिडिओ शेअर करत या बॅंगाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. . राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे असे आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे.