Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराने बुडवली हजारो कोटीची रॉयल्टी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut, on Sunil Shelke : खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 02, 2025 | 02:12 PM
mp sanjay raut target devendra fadnvais and nitesh rane on aaditya thackeray clean chit

mp sanjay raut target devendra fadnvais and nitesh rane on aaditya thackeray clean chit

Follow Us
Close
Follow Us:

Sanjay Raut, on Sunil Shelke : मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांवनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. सत्ताधारी भाजपवर टीका करताना खासदार राऊत यांनी  अजित पवारांच्या आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर देखील पत्र लिहिले असून त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना आमदार सरकारी तिजोरीवरच दरोडे टाकत असल्याचा आरोप केला आहे . भाजप समर्थक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी न देता राज्य सरकारची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “भ्रष्टाचार व जनतेची फसवणूक वगैरे विषयांवर आपण नेहमीच बोलत असता. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू असे आपले धोरण आहे. प्रत्यक्षात राज्यातले चित्र नेमके उलटे आहे. कुंपणच शेत खात असून शेत खाणाऱ्यांना सरकारचे अभय असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपल्या सभोवती असलेले लोक सरकारला पाठिंबा देण्याची किंमत वसूल करण्यासाठी सरकारी तिजोरीवरच दरोडे टाकीत आहेत. मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) यांनी सरकारच्या केलेल्या लुबाडणुकीचे प्रकरण माझ्या समोर आले. पुढील कारवाईसाठी मी ते आपल्याकडे पाठवीत आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी कसेला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे संजय राऊत यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप करत लिहिले आहे की, “महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासाठी, औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ४, गाव मौजे आंबळे येथील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. आय डी सी-२०२०/प्रक्र ५८८) ३.१४ दि. २२/०४/२०२१ द्वारे जाहीर केले आहे. सदर गावात व त्या शेजारी अनेक क्रशर उद्योजकांच्या खाणी आहेत. तसेच तेथे जवळपास १०० फुटांचे खोल मोठे खड्डे केलेले आहेत. सदर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळास वापरण्यासाठी योग्य नसल्याने ते सर्व खाणीचे गट हे प्रथमदर्शनी सदर राजपत्रामध्ये खाणीच्या जमिनी वगळण्यात आल्या आहेत”

मा.मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस जी,
काय सुरू आहे महाराष्ट्रात?
थांबवा ही लुटमार!
⁦@Dev_Fadnavis⁩
⁦@cbawankule⁩
⁦@AjitPawarSpeaks⁩
⁦@PMOIndia⁩
⁦@AmitShah⁩ pic.twitter.com/ClGyjIXF43
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2025

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “क्षेत्रामध्ये आंबळे येथील सुनील शंकरराव शेळके व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या गट क्र. १२३,१२५, १४९,१५२,१५३/१,१५४,१५८,१७१/२ व १९५ अशा २९ हेक्टर ८६.१० आर क्षेत्रावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने शासन निर्णय (१९६१ च्या प्रकरण ६) काढून सदरच्या जमिनी संपादन करत आहेत व तसेच मावळ आमदार सुनील शंकरराव शेळके, यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर दगड खाणींचे बेकायदेशीर उत्खनन केले आहे, त्याबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांनी सुनील शंकरराव शेळके व त्यांचे बंधू सुदाम शंकरराव शेळके यांनी दि. ३१/०७/२०२३ रोजी केलेल्या अर्जानुसार संपादन जागेच्या बदल्यात पर्यायी क्षेत्र मिळणेबाबत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे मागणी केलेली होती. जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळास वापरण्यासाठी योग्य नाही असे असताना देखील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने शासन निर्णय काढून सदरच्या जमिनी संपादन करून त्यांना २९ हेक्टर ८६.१० आर पर्यायी क्षेत्र देत आहेत,” असा आरोप खासदार राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमदार सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडविलेली आहे. त्याची भरपाई कशी करणार आहात? त्याबाबत आपल्या मार्फत त्वरित आदेश देण्यात यावेत. भूसंपादन करताना अनेक शेतकऱ्यांची राहती घरे व बागायती जमिनी आपण घेता, त्यांना कधीही आपण बदली जमिनी दिल्या नाहीत, त्यांना हा न्याय का नाही? अशा अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादन रक्कम स्वीकारलेली आहे, ती परत घेऊन त्यांना बदली जमीन देणार का? बदली जमिनीचा न्याय फक्त आमदार या नात्याने आमदार सुनील शेळके व त्यांच्या कुटुंबीयांनाच आहे का? त्यांच्या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांच्या संपादनामध्ये आलेल्या जमिनी आपण घेतलेल्या नाहीत. हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Mp sanjay raut alleges that maval ncp mla sunil shelke has embezzled royalties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • MP Sanjay Raut
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

Shaktipeeth highway : इच्छामरणाची परवानगी द्या! शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे रक्ताने पत्र
1

Shaktipeeth highway : इच्छामरणाची परवानगी द्या! शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे रक्ताने पत्र

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
2

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ
3

मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली ८६ उमेदवारांची यादी जाहीर
4

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली ८६ उमेदवारांची यादी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.