Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maval Politics: ‘ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली २५-३५ लाखांची वसुली’; सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप.

नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा, मात्र वैयक्तिक कार्यक्रमांपेक्षा जनतेच्या कामांना प्राधान्य द्या, असा स्पष्ट संदेश दिला.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 16, 2026 | 05:24 PM
Maval Politics:  ‘ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली २५-३५ लाखांची वसुली’;  सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप.
Follow Us
Follow Us:
  • ईव्हीएम हॅक करण्याच्या बहाण्याने भाजप नेत्यांनी उमेदवारांकडून पैसे उकळले; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीची मागणी
  • १५ पैकी १५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय.
  • वैयक्तिक कार्यक्रमांपेक्षा जनतेच्या कामांना आणि ‘जनता दरबाराला’ प्राधान्य द्या.
वडगाव मावळ/सतिश गाडे : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत १५ पैकी १५ जागांवर विजय मिळवल्यानंतर वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात बोलताना आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले.

ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली काही भाजप नेत्यांनी उमेदवारांकडून २५ ते ३५ लाख रुपये उकळल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकरणाची थेट मुख्यमंत्र्यांकडून चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. “कोणीही माझ्यामुळे मोठे झाले असे वाटत असेल तर २०२९ ला माझ्या विरोधात उभे राहा,” असे आव्हान देत शेळके यांनी आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याचे स्पष्ट केले.

वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये

नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा, मात्र वैयक्तिक कार्यक्रमांपेक्षा जनतेच्या कामांना प्राधान्य द्या, असा स्पष्ट संदेश दिला. दर आठवड्याला होणाऱ्या जनता दरबाराला हजर राहणे बंधनकारक असल्याचे सांगत “पक्षाचे काम हे घरचे काम नसून जनतेची जबाबदारी आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. येणाऱ्या २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत मावळचा आमदार दीड लाख मताधिक्याने विजयी होईल आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यास माजी मंत्री मदन बाफना, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला. निवडणुकीतील भव्य यशानंतरही आनंदोत्सव टाळून कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

Accident News : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार

कसा आहेत मावळ तालुक्यातील निवडणुकीतील विजय?

मावळ तालुका येथे झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ने तब्बल १५ जागांवर दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.(Maval News) गेल्या २५ वर्षांपासून मावळ पंचायत समितीवर सत्ता असलेल्या भाजपाला यावेळी एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे हा निकाल भाजपासाठी मोठा धक्का मानला जात असून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासाठीही हा पराभव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे. (Political News)

चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीचा कौल

इंदुरी–वराळे जिल्हा परिषद गटात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी–पिछाडी सुरू असताना अंतिम निकालात राष्ट्रवादीच्या पल्लवी दाभाडे यांनी बाजी मारली. खडकाळे–कार्ला जिल्हा परिषद गटात पुणे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाबुराव वायकर यांच्या पत्नी आशा वायकर यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीच्या दीपाली हुलावळे विजयी झाल्या आहेत.

 

Web Title: Recovery of rs 25 35 lakhs under the guise of evm hacking sunil shelke makes serious allegations against bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • EVM
  • Maval Politics
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा
1

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
2

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.